शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

फुटबॉल ग्राऊंड बनले दारुड्यांचा अड्डा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:07 IST

मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष : कचरा संकलनामुळे दुर्गंधी : कंत्राटदाराने केबल बंडल ठेवण्यासाठी बनविले गोदाम लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ...

मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष : कचरा संकलनामुळे दुर्गंधी : कंत्राटदाराने केबल बंडल ठेवण्यासाठी बनविले गोदाम

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शंकर नगर भागातील फुटबॉल ग्राऊंडला कंत्राटदाराने केबल बंडल ठेवण्याचे गोदाम बनविले आहे. त्यात अवैध पार्किंग, करण्यात आलेले जागोजागी खोदकाम यामुळे मुलांना खेळता येत नाही. दुसरीकडे रात्रीच्या अंधारात परिसरातील दारुडे मैदानात दारू पिऊन धुडगूस घालत असल्याने परिसरातील नागरिकांत दहशत पसरली आहे.

कंत्राटदाराने अंडर ग्राऊंड केबल टाकण्यासाठी जागोजागी खोदकाम केले आहे. खोदकामाचा मलबा अजूनही तसाच पडून आहे. मनपा प्रशासनाची परवानगी न घेता केबलचे बंडल मैदानात ठेवण्यात आले आहे. मैदानाच्या एका बाजूला कचरा संकलन केंद्र बनविण्यात आले आहे. सफाई कर्मचारी परिसरातून संकलित केलेला कचरा येथे जमा करतात. दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त आहेत. यासंदर्भात मनपा प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी करूनही याची दखल घेतली जात नसल्याने नागरिकांत असंतोष आहे.

तीन महिन्यांपूर्वी वादळामुळे मैदानात झाडे पडले होते. ते अजूनही तसेच पडून आहे. मनपाच्या उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ते हटविलेले नाही. ते त्वरित हटविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली.

....

व्यावसायिकांची अवैध पार्किंग

ट्रान्सपोर्ट व्यवसायिक, लॉन संचालकांनी मैदानालाच पार्किंग बनविले आहे. येथे वाहने उभी ठेवली जातात. वाहने उभी करण्यावरून परिसरातील नागरिकांशी वाद करतात. या संदर्भात तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नसल्याची माहिती नागरिकांनी दिली.

....

सांस्कृतिक भवनावर कब्जा

मैदानातील सांस्कृतिक भवनावर अवैध कब्जा केला आहे. येथील क्रीडा साहित्याची देखभाल करण्यासाठी मनपा प्रशासनाने सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्याची गरज आहे. सांस्कृतिक भवनावरील कब्जा हटविण्यात यावा. सार्वजिनक कार्यासाठी त्याचा वापर करता यावा. अशी नागरिकांची मागणी आहे.

....

मनपा आयुक्तांकडे तक्रार

शंकर नगर परिसरातील त्रस्त नागरिकांनी मंगळवारी अ‍ॅड. अक्षय समर्थ यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्तांना फुटबॉल ग्राऊंडच्या दुरवस्थेबाबत निवेदन दिले. येथील कचरा संकलन केंद्र हटविण्यात यावे. मैदानात ठेवण्यात आलेले केबल बंडल हटविण्यात यावे. परिसरात दिवे लावण्यात यावे, खोदकामाची माती हटविण्यात यावी. रात्रीच्या सुमारास दारुडे दारू पितात याला आळा घालण्यासाठी सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात यावी. अवैध पार्किंगला आळा घालावा, अशी मागणी केली.