शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

जमिनीतील बॉक्साईटपासून बनते हवेत उडणारे विमान...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 01:19 IST

जमिनीतील बॉक्साईट नावाच्या खडकाची माती बनवितात. त्यावर सोडियम हायड्रॉक्साईडची प्रक्रिया करून सॉलिड पार्ट आणि लिक्विड पार्ट तयार करतात. लिक्विड पार्टवर सोडियम अ‍ॅल्युमिनेट लिकरची प्रोसेस करून पांढऱ्या रंगाचे अ‍ॅल्युमिना मिळते. त्याला १ हजार डिग्री तापमानावर तापवून अ‍ॅल्युमिनियमचे भांडे, केबल अन् हवेत उडणारे विमान तयार करतात येते, ही माहिती ऐकून रमण विज्ञान केंद्रातील सायन्स एक्स्पोला भेट देणारे विद्यार्थी, नागरिक थक्क झाले.

ठळक मुद्देसायन्स एक्स्पो : मानवाच्या उत्कर्षाचा उलगडला प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जमिनीतील बॉक्साईट नावाच्या खडकाची माती बनवितात. त्यावर सोडियम हायड्रॉक्साईडची प्रक्रिया करून सॉलिड पार्ट आणि लिक्विड पार्ट तयार करतात. लिक्विड पार्टवर सोडियम अ‍ॅल्युमिनेट लिकरची प्रोसेस करून पांढऱ्या रंगाचे अ‍ॅल्युमिना मिळते. त्याला १ हजार डिग्री तापमानावर तापवून अ‍ॅल्युमिनियमचे भांडे, केबल अन् हवेत उडणारे विमान तयार करतात येते, ही माहिती ऐकून रमण विज्ञान केंद्रातील सायन्स एक्स्पोला भेट देणारे विद्यार्थी, नागरिक थक्क झाले.गांधीसागर येथील रमण विज्ञान केंद्रात विविध संस्थांमध्ये होत असलेल्या संशोधन आणि विकासाची माहिती देण्यासाठी विज्ञान एक्स्पोचे आयोजन करण्यात आले. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवकांमध्ये विज्ञानाप्रति आवड आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी हे प्रदर्शन यशस्वी ठरले. प्रदर्शनात भारतीय मानवविज्ञान सर्वेक्षण, परमाणु खनिज आणि संशोधन संचालनालय, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन संस्था, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, मॅगनिज ओर इंडिया लिमिटेड, जवाहरलाल नेहरू अ‍ॅल्युमिनियम रिसर्च डिझाईन अँड डेव्हलपमेंट सेंटर आदी संस्थांनी आपल्या संशोधनाची माहिती दिली.आदिमानव ते जंटलमनचा प्रवास 

प्रदर्शनात अँथ्रापॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडियातर्फे मानवाच्या प्रगतीचा आढावा घेणारी माहिती प्रदर्शनात मांडण्यात आली. यात दोन आणि पायावर चालणाऱ्या मानवाच्या मेंदूचा विकास झाल्यानंतर तो दोन पायावर चालू लागला. दगड एकमेकांवर आदळून आग तयार करणे, शेती करण्याचे तंत्र त्याला आत्मसात झाले अन् तो आधुनिक झाल्याचा इतिहास सादर करण्यात आला. याशिवाय भारताच्या विविध भागात शेती करण्याचे प्रकार, अन्न साठविण्याच्या पद्धती, संस्कृती, घरे आदींवर प्रकाश टाकण्यात आला.युरेनियमपासून वीजनिर्मितीन्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने युरेनियमपासून वीज कशी तयार होते, याची माहिती वरिष्ठ कार्यकारी अभियंता सुनील पाटील यांनी दिली. यात युरेनियम आणि जड पाणी घेऊन ते प्रेशराईज हेवी वॉटर रिअ‍ॅक्टर या अणुभट्टीत नॅचरल युरेनियम इंधन म्हणून वापरतात तर जड पाणी कुलंट म्हणून वापरतात. अणुभट्टीत नॅचरल युरेनियमचे विखंडन होते आणि यादरम्यान उष्णता तयार होते. या उष्णतेचा वापर करून बॉयलरमध्ये साध्या पाण्याची वाफ बनवितात. या वाफेवर टर्बाईन जनरेटरच्या माध्यमातून वीज तयार करतात. देशात अशा २२ अणुभट्ट्या असून, दररोज ६,७८० मेगावॅट वीज तयार करण्यात येते.भूगर्भातील खनिजांचा शोध 
मिनरल एक्स्प्लोरेशन कार्पोरेशन लिमिटेडचे आलोक डहरवाल यांनी जमिनीतील खनिजांचा शोध कसा घेतात याची माहिती दिली. ते म्हणाले, जमिनीतून कॉपर, लेड, झिंक, कोळसा, लाईम स्टोन, आयर्न यांचा शोध घेऊन ते किती प्रमाणात जमिनीत आहे याची माहिती मिळविण्यात येते. यात रिमोट सेंसींगने भूवैज्ञानिक निरीक्षण करण्यात येते. निरीक्षणानंतर रासायनिक विश्लेषण केल्यानंतर जमिनीत किती धातू आहे, त्याचा दर्जा कसा आहे याची माहिती मिळते. त्याचा अंतिम अहवाल तयार करून केंद्र शासनाला सादर केल्यानंतर संबंधित ठिकाणी खोदकामासाठी मंजुरी देण्यात येते.विद्यार्थ्यांनी घेतली थंड हवा देणाऱ्या एसीची माहिती 
इंडियन सोसायटी ऑफ हिटींग रेफ्रिजरेटींग अँड एअर कंडीशनरतर्फे एसीमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध पार्टची माहिती विद्यार्थ्यांना दिली. एसीतील कॉम्प्रेसर, खाली वर होणारा रेसी प्रोकेटींग, गोल फिरणारा स्क्रोल कॉम्प्रेसर आदींची माहिती विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले.

 

टॅग्स :Raman Science Centreरमण विज्ञान केंद्रnagpurनागपूर