शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

फ्लार्इंग क्लब नियमबाह्य

By admin | Updated: May 9, 2015 02:18 IST

डायरेक्टोरेट जनरल आॅफ सिव्हील एव्हिएशनचे (डीजीसीए) सर्व नियम धाब्यावर बसवून नागपूर फ्लार्इंग क्लब आपल्या प्रशिक्षणार्थी पायलट्सना ‘सोलो फ्लाईट्स’ देत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सोपान पांढरीपांडे  नागपूर डायरेक्टोरेट जनरल आॅफ सिव्हील एव्हिएशनचे (डीजीसीए) सर्व नियम धाब्यावर बसवून नागपूर फ्लार्इंग क्लब आपल्या प्रशिक्षणार्थी पायलट्सना ‘सोलो फ्लाईट्स’ देत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. डीजीसीएच्या नियमाप्रमाणे व्यावसायिक पायलट्सचे लायसन्स मिळण्यासलाठी २०० तासांचे विमान उड्डाण आवश्यक असते व यापैकी किमान १०० तास सोलो फ्लाईट्स म्हणजे वैमानिकांना एकट्याने विमानोड्डाण करावयाचे असते. प्रशिक्षणार्थी वैमानिकाला सुरुवातीला प्रशिक्षकासोबत उड्डाण करवितात व साधारणपणे ५० तासाचे उड्डाण झाल्यावर मग सोलो फ्लाईट्स दिल्या जातात. नियमबाह्य सोलो फ्लाईट्सनागपूर फ्लार्इंग क्लबने मात्र प्रशिक्षणासोबतच्या उड्डाणालाच सोलो फ्लाईट्स बनविण्याचे एक अफलातून तंत्र विकसित केले आहे, अशी माहिती विमानतळ सूत्रांनी दिली. कुठल्याही विमानोड्डाणासाठी एअर ट्रॅफिक कंट्रोलर (एटीसी)ची परवानगी वैमानिकाला रेडिओ संपर्काद्वारे घ्यावी लागते. सोलो फ्लाईट द्यायची असेल तर विमानात केवळ एकच व्यक्ती आहे हेही सांगावे लागते. यासाठी ‘पर्सन आॅन बोर्ड झिरो वन’ म्हणजे ‘पीओबी झिरो वन’ असा कोडवर्ड एटीसीच्या भाषेत वापरला जातो. नागपूर फ्लार्इंग क्लबने प्रशिक्षणार्थी पायलट प्रशिक्षकसोबत असला तरी ‘पीओबी झिरो वन’ असा कोडवर्ड वापरून सोलो फ्लाईट घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अशा प्रकारे सोलो फ्लाईट्सची १०० तासाची अट लवकर पूर्ण होत असल्याने प्रशिक्षणार्थी या गैरप्रकारात सामील होतात. एटीसीने सोलो फ्लाईट्ची परवानगी दिल्यानंतर तशी नोंद एटीसी टॉवरमध्ये आॅथोरायजेशन बुकमध्ये त्वरित केली जाते. नागपूर फ्लार्इंग क्लब हे का करतो? नागपूर : शिवाय बाहेर प्रत्येक विमानाची हालचाल सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे होत असते. पण हे दोन्ही रेकॉर्ड्स एकमेकांशी कधीच पडताळून पाहिले जात नाही. त्यामुळे हा गैरप्रकार उघडकीस येत नाही, असेही सूत्रांनी सांगितले. २००८ साली पुनरुज्जीवन मिळाल्यापासून नागपूर फ्लार्इंग क्लब कधीही व्यवस्थित चालला नाही. राज्य सरकारद्वारा संचालित हा क्लब इतर पायलट ट्रेनिंग स्कूलप्रमाणे नोकरीची हमी देऊ शकत नाही,. त्यामुळे दरवर्षी प्रशिक्षणार्थ्यांची संख्या घटत चालली आहे. सध्या फक्त १० प्रशिक्षणार्थी या क्लबजवळ आहेत. दुसरीकडे जागतिक मंदीमुळे नागरी विमान क्षेत्र गेल्या अनेक वर्षांपासून बेजार आहे व त्यामुळे कमर्शियल पायलट्सची मागणीही कमी झाली आहे. नागपूर फ्लार्इंग क्लबमधून गेल्या तीन वर्षात २६ पायलट तयार झाले, पण त्यापैकी फक्त एकालाच इंडिगो एअरलाईन्समध्ये नोकरी मिळाली आहे. यावरून पायलट्सच्या बेकारीची भीषणता लक्षात येते. या पार्श्वभूमीवर आम्ही कमीत कमी वेळात पायलट प्रशिक्षित करतो असा दावा करण्यासाठी नागपूर फ्लार्इंग क्लब नियमबाह्य फ्लाईट्स देत आहे. याबाबतीत एटीसीला नोव्हेंबर २०१३ आणि मे २०१४ मध्ये शंकाही आली होती. त्यावेळी प्रशिक्षणार्थी पायलटने घाबरून उड्डाण रद्द केले होते. तसेच दोन्ही वेळी विमान रन वे बाहेर गेले होते, अशी माहितीही सूत्रांनी दिली. याबाबतीत संपर्क केला असता चीफ फ्लार्इंग इन्स्ट्रक्टर एसएमए सलाम यांनी सोलो फ्लाईट्स नियमबाह्य आहेत हे नाकारले. क्लबची बदनामी करण्यासाठी कुणीतरी या कंड्या पिकवित आहे, असे सलाम म्हणाले. मात्र गेल्या दोन वर्षात विमान रन वे बाहेर गेले होते, हे त्यांनी मान्य केले. एटीसीचे प्रमुख वालदे यांनी या प्रकाराबाबत बोलणे नाकारले व चौकशीचा चेंडू एअर पोर्ट डायरेक्टर मनोजकुमार यांचेकडे टोलविला. हा प्रकार थांबवण्यासाठी आॅथोरायझेशन बुक व सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी नियमित करणार का, या प्रश्नाला उत्तर देतांना मनोजकुमार म्हणाले, ही डीजीसीएच्या अधिकार क्षेत्रातील बाब आहे. नागपूर फ्लार्इंग क्लबचे प्रबंध संचालक एम.ए.एच. खान यांच्याशी वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही. आता या सर्व प्रकाराची चौकशी करून तो थांबवणयासाठी डीजीसीए कुठली कारवाई करते पाहणे रंजक ठरेल. (प्रतिनिधी)