शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘फ्लाेराईड’मुळे जलस्रोत सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : निमखेडा (ता. माैदा) येथील बहुतांश जलस्रोतांमधील पाण्यात ‘फ्लाेराईड’ असल्याने तसेच ‘फ्लाेराईड’युक्त पाणी प्यायल्याने ‘फ्लाेराेसीस’ ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रेवराल : निमखेडा (ता. माैदा) येथील बहुतांश जलस्रोतांमधील पाण्यात ‘फ्लाेराईड’ असल्याने तसेच ‘फ्लाेराईड’युक्त पाणी प्यायल्याने ‘फ्लाेराेसीस’ हाेण्याची शक्यता असल्याने गावासाेबतच परिसरातील जलस्रोत सील करण्यात आले आहेत. मात्र, शासन व जिल्हा प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची काेणतीही प्रभावी साेय न केल्याने स्थानिक नागरिकांना राेज पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. ही समस्या गंभीर रूप धारण करीत असून, ती साेडविणार कधी, असा प्रश्नही स्थानिक महिलांनी उपस्थित केला आहे.

निमखेडा हे माैदा तालुक्यातील महत्त्वाच्या माेठ्या गावांपैकी एक असून, या गावाची लाेकसंख्या ५,२०० च्या वर आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या काही याेजनांद्वारे पाणीपुरवठा याेजनांची निर्मिती केली जाते. मात्र, निमखेडा येथील बहुतांश जलस्रोत ‘फ्लाेराईड’युक्त असल्याने तसेच ते पाणी पिण्यायाेग्य नसल्याने जलस्रोत सील करण्यात आले आहेत.

गावातील पाणीसमस्या साेडविण्यासाठी शासन व प्रशासनाला वारंवार निवेदने व प्रस्ताव सादर केल्याची माहिती सरपंच प्रमाेद बरबटे यांनी दिली. परंतु, यावर अद्यापही सकारात्मक निर्णय घेण्यात आला नाही, असा आराेपही त्यांनी केला. निमखेडा पंचायत समिती सर्कलचे गाव असून, येथे माेठा आठवडी बाजार भरताे. परिसरातील शेकडाे नागरिक या गावात बाजारासह शासकीय व इतर कामांसाठी तसेच विद्यार्थी शिक्षणासाठी नियमित येतात. स्थानिक नागरिकांसाेबत त्यांनाही निमखेडा येथे आल्यानंतर पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामाेरे जावे लागते. ही समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत असल्याने ती तातडीने मार्गी लावावी, अशी मागणी सरपंच प्रमाेद बरबटे यांच्यासह महिला व नागरिकांनी केली आहे.

...

‘फ्लाेराेसीस’ हाेण्याची शक्यता

‘फ्लाेराईड’चे प्रमाण या भागातील पाण्यामध्ये अधिक असल्याने ते पिण्यायाेग्य नाही, अशी माहिती आराेग्य विभागाने त्यांच्या अहवालाद्वारे दिली आहे. ‘फ्लाेराईड’युक्त पाणी प्यायल्याने नागरिकांना दात, पाेट व हाडांचा ‘फ्लाेराेसीस’ नामक आजार हाेताे. यात दात व हिरड्यांना कीड लागत असून, शरीरातील हाडे ठिसूळ हाेतात. त्यामुळे हातपाय वाकडे हाेतात. नागरिकांना पाेटदुखी व महिलांसह मासिक पाळीचे आजार जडतात. विशेष म्हणजेे, हे आजार असाध्य असतात.

....

पाण्याची टाकी निरुपयाेगी

गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी १५ वर्षांपूर्वी पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले, शिवाय पाण्याच्या वितरणासाठी पाईप लाईनदेखील टाकण्यात आली. पाण्यात ‘फ्लाेराईड’ असल्याने तसेच शासनाने वेळीच पर्यायी व्यवस्था न केल्याने पाण्याची टाकी व पाईप लाईन काही वर्षापासून निरुपयाेगी झाली आहे. टाकी व पाईप लाईन जीर्ण हाेत चालली आहे. सध्या गावातील नागरिकांना खागी बाेअरवेल व विहिरीतील पाणी पिण्यासाठी वापरावे लागते, अशी माहिती सरपंच प्रमाेद बरबटे यांच्यासह नागरिकांनी दिली.

.......

जिल्हा खनिकर्म विभागाकडे ही समस्या साेडविण्यासाठी निधी मिळावा म्हणून पाणीपुरवठा याेजनेचा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाला प्रशासनाने अद्यापही मंजुरी दिली नाही. त्यामुळे पाठपुरावा सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने हा निधी तातडीने मंजूर करवून द्यावा.

- प्रमाेद बरबटे, सरपंच, निमखेडा.