नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विशाखापट्टणमसाठी २८ मार्चपासून विमानसेवा सुरू होत आहे. नागपूरवरून विशाखापट्टणमसाठी पहिल्यांदाच थेट विमान सुरू करण्यात येत असून, हे विमान दररोज उपलब्ध राहणार आहे. विमान क्रमांक ६ ई ७१६६ नागपूरवरून सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी दुपारी ४.२५ वाजता रवाना होऊन, सायंकाळी ६.१५ वाजता विशाखापट्टणमला पोहोचेल. रविवारी नागपूरवरून हे विमान सकाळी ११.२० वाजता रवाना होईल. विमान क्रमांक ६ ई ७१६७ विशाखापट्टणमवरून सायंकाळी दुपारी ४.३५ वाजता रवाना होऊन नागपूरला रात्री ८.२५ वाजता पोहोचेल. रविवारी विशाखापट्टणमवरून हे विमान दुपारी १.२५ वाजता उपलब्ध होईल. यासाठी इंडिगोचे ७८ प्रवासीक्षमतेच्या विमानाचे संचालन होणार आहे. उन्हाळ्यात समुद्र तटावरील शहरासाठी मागणीनुसार विमान कंपनीने समर शेड्युलमध्ये विमानसेवा सुरू केली आहे. दीर्घकाळ लॉकडाऊनमध्ये बंदी असल्यामुळे आता नागरिक पर्यटनासाठी जात असल्यामुळे विमान कंपन्याही विमानसेवा सुरू करीत आहेत.
नागपूरवरून विशाखापट्टणमसाठी २८ मार्चपासून विमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:08 IST