शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

भाग्यश्री वासनकरसह पाच आरोपींना दणका

By admin | Updated: August 31, 2016 02:28 IST

अंबाझरी पोलिसांनी छावणी येथील बंटेश्वरी नायडू (३८) यांच्या तक्रारीवरून भाग्यश्री वासनकरसह अन्य

नागपूर : अंबाझरी पोलिसांनी छावणी येथील बंटेश्वरी नायडू (३८) यांच्या तक्रारीवरून भाग्यश्री वासनकरसह अन्य आरोपींविरुद्ध दुसरा एफआयआर (प्रथम खबरी अहवाल) नोंदविला आहे. हा एफआयआर रद्द करण्यात यावा अशा विनंतीसह भाग्यश्री वासनकर व इतर चार आरोपींनी दाखल केलेला फौजदारी अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी फेटाळून लावला. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अतुल चांदूरकर यांनी हा निर्णय दिला. यामुळे आरोपींना जोरदार दणका बसला आहे. अर्जदारांमध्ये भाग्यश्री वासनकरसह जयंत गुलाबराव चौधरी, सारिका चंदेल, पायल बत्रा व मीनाक्षी कोवे यांचा समावेश होता. अंबाझरी पोलिसांनी गुंतवणूकदारांच्या फसवणुकीसंदर्भात नायडू यांच्या तक्रारीपूर्वीच एक एफआयआर नोंदविला आहे. असे असताना नायडू यांच्या तक्रारीवरून दुसरा एफआयआर दाखल करण्याची आवश्यकता नाही. हा एफआयआर रद्द करण्यात यावा अशी विनंती अर्जात करण्यात आली होती. अंबाझरी पोलिसांनी नायडू यांच्या तक्रारीवरून २९ डिसेंबर २०१५ रोजी सदर अर्जदारांसोबत वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीचा सर्वेसर्वा प्रशांत जयदेव वासनकर, विनय जयदेव वासनकर, मिथिला विनय वासनकर, सरला जयदेव वासनकर, अभिजित जयंत चौधरी, कुमुद जयंत चौधरी, देवानंद बेनीशाम सातपुते, कुमार बाबुलाल लाखे व कंपनीच्या इतर संबंधित संचालकांविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४०६, ४०९, १२०-ब, ३४ व महाराष्ट्र गुंतवणुकदार हित संरक्षण कायद्याच्या कलम ३ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. आरोपींनी आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून १ कोटी ४३ लाख ४५ हजार ९२५ रुपयांनी फसवणूक केली अशी नायडू यांची तक्रार आहे. अर्जदारांतर्फे अ‍ॅड. देवेंद्र चव्हाण तर, शासनातर्फे अतिरिक्त अभियोक्ता एम. जे. खान यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)