शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

तरुणास पेट्रोलने जिवंत जाळणारे पाच आरोपी निर्दोष

By admin | Updated: February 10, 2016 03:31 IST

अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांढराबोडी येथे एका तरुणास पेट्रोलने जिवंत जाळून खून करणाऱ्या पाच आरोपींची अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या न्यायालयाने निर्दोष सुटका केली.

न्यायालय : पांढराबोडी येथे घडली होती घटनानागपूर : अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांढराबोडी येथे एका तरुणास पेट्रोलने जिवंत जाळून खून करणाऱ्या पाच आरोपींची अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या न्यायालयाने निर्दोष सुटका केली. राजेश कल्लू मोगरे, असे मृताचे नाव होते. तो पांढराबोडी येथील रहिवासी होता. गुड्डू राजेश कासेकर (२५), लोटन सुदर्शन सकतेल (५५), राजेश ईश्वर कासेकर (४४), अनिल बंसीलाल चव्हाण (३५) आणि लीलाबाई लोटन सकतेल (५०) सर्व रा. पांढराबोडी, अशी आरोपींची नावे आहेत. खुनाची ही घटना ४ डिसेंबर २०१२ रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली होती. सरकार पक्षानुसार मृत राजेश मोगरे आणि आरोपी हे एकमेकांच्या शेजारी राहायचे. त्यांची नेहमीच आपसात भांडणे व्हायची. घटनेच्या दिवशी मोगरे याचे लोटन सकतेल याच्यासोबत भांडण झाले असता लीलाबाईने चिथावणी दिली. लोटन याने त्याच्या अंगावर पेट्रोल ओतले होते. राजेश कासेकर आणि अनिल चव्हाण यांनी त्याला पकडून ठेवले होते. त्यानंतर गुड्डू कासेकर याने आगकाडीने त्याला पेटवून दिले होते. मोगरे हा ८९ टक्के जळाला होता. अनिल चव्हाणचे हातही जळाले होते. शेजाऱ्यांनी आग विझवून मोगरे याला उपचारार्थ मेयो इस्पितळात नेले असता दुसऱ्या दिवशी ५ डिसेंबर २०१२ रोजी त्याला मृत्यू झाला होता. त्याचे मृत्यूपूर्व बयाण नोंदवण्यात आले होते. मृताची आई सुधा मोगरे हिच्या तक्रारीवर अंबाझरी पोलिसांनी भादंविच्या ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक केली होती. न्यायालयात १० साक्षीदार तपासण्यात आले. बचाव पक्षाच्या वकिलांनी आपल्या युक्तिवादात सांगितले की, तपासात बऱ्याच त्रुटी आहेत. मृत्यूपूर्व बयाण आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षीत तफावती आहेत. प्रत्यक्ष घटना कोणत्या ठिकाणी घडली, याबाबतही संशय आहे. एक आरोपी अनिल चव्हाण याच्या हातावरील जखमांचे व्रण जळाल्याचे नसून त्या जखमा अन्य बाबीने झालेल्या आहेत. न्यायालयाने बचाव पक्षाचे म्हणणे ग्राह्य धरून सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली. न्यायालयात आरोपींच्या वतीने अ‍ॅड. आर. के. तिवारी, अ‍ॅड. पराग उके, अ‍ॅड. काझी, अ‍ॅड. चेतन ठाकूर तर सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील सुनीता खोब्रागडे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)