शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरूंच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’कडे पहिले पाऊल

By admin | Updated: August 21, 2015 03:13 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणून ‘५०-५०’ परीक्षा प्रणाली लागू करण्याचे ..

योगेश पांडे  नागपूरराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणून ‘५०-५०’ परीक्षा प्रणाली लागू करण्याचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. यासंदर्भातच विधीसभा सदस्य डॉ. राजेंद्र काकडे यांच्या प्रस्तावावर शुक्रवारी होणाऱ्या विद्वत परिषदेच्या बैठकीत चर्चा होणार आहे. जर या बैठकीत याला संमत करण्यात आले तर कुलगुरूंच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’कडे हे पहिले पाऊल ठरेल.परीक्षा प्रणाली ही विद्यापीठासाठी सर्वात मोठी समस्या झाली आहे. विद्यापीठाच्या प्रगतीसाठी या परीक्षा पद्धतीमध्ये समूळ बदलाची आवश्यकता असून ‘५०-५०’ परीक्षा प्रणाली लागू करण्याची आवश्यकता असल्याची संकल्पना डॉ. काणे यांनी पदग्रहण केल्यानंतर लगेच मांडली होती. विधीसभेचे सदस्य डॉ.राजेंद्र काकडे यांनीदेखील याच आशयाचा ठराव विधीसभेच्या मागील बैठकीत मांडला होता. या प्रस्तावावर विद्वत परिषदेत चर्चा व्हावी, असे विधीसभेने सुचविले होते. दरम्यान, त्यानंतर विद्यापीठात सत्ताबदल झाला व नेमका हाच प्रस्ताव कुलगुरूंचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ होता. यावर शुक्रवारी होणाऱ्या विद्वत परिषदेच्या बैठकीत चर्चा होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. हा प्रस्ताव डॉ.काकडे यांचा असला तरी कुलगुरूंचादेखील हाच ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असल्याने या प्रस्तावावर सखोल चर्चा होणे अपेक्षित असल्याचे मत सूत्रांनी व्यक्त केले.