शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

स्पेसवूड कंपनीतील आग धूमसतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क हिंगणा : एमआयडीसी परिसरातील स्पेसवूड नामक फर्निचरच्या कंपनीला मंगळवारी (दि. २९) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास आग ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

हिंगणा : एमआयडीसी परिसरातील स्पेसवूड नामक फर्निचरच्या कंपनीला मंगळवारी (दि. २९) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास आग लागली. जिल्ह्यातील आठ ठिकाणचे अग्निशमन दल ही आग विझवण्याचे अविरत प्रयत्न करीत असून, २४ तासानंतर ती नियंत्रणात आली असली तरी पूर्णपणे विझली नाही. या आगीत अंदाजे २०० काेटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती एमआयडीसी व्यवस्थापनाने दिली.

हिंगणा एमआयडीसी परिसरात विवेक देशपांडे व किरीट जाेशी यांची स्पेसवूड नामक कंपनी असून, त्यात फर्निचर तयार केले जाते. या कंपनीच्या आवारात सर्वत्र प्लायवूड व लाकडाचा भुसा तसेच तुकडे असल्याने कार्यालय परिसरातील शेडमध्ये लागलेली आग सर्वत्र पसरत गेली. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सुरुवातीला एमआयडीसी व नंतर नागपूर महानगरपालिका, वाडी नगर परिषद व डिफेन्सच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ही आग नियंत्रणात येत नसल्याचे लक्षात येताच जिल्ह्यातील काटाेल, कळमेश्वर, सावनेर व नरखेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

या सर्वांनी आग विझविण्यासाठी अथक प्रयत्न सुरू केले. ही आग पसरत गेल्याने त्यात कंपनीतील पाचही प्राॅडक्शन युनिट पूर्णपणे जळाले. केवळ कंपनीचे कार्यालय सुरक्षित राहिले आहे. ही आग बुधवारी रात्रीपर्यंत नियंत्रणात आली असली तरी ती पूर्णपणे विझली नव्हती. यात कंपनीचे अंदाजे २०० काेटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती एमआयडीसी व्यवस्थापनाने दिली. ही आग नेमकी कशामुळे लागली, हे मात्र अद्यापही कळू शकले नाही.