शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बोगस जात प्रमाणपत्र मिळविणाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदविणे अवैध

By admin | Updated: June 26, 2015 02:51 IST

कोणत्याही मार्गाने वा पद्धतीने बोगस जात प्रमाणपत्र मिळविणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविणे अवैध आहे.

हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय : कायद्यात खासगी तक्रार दाखल करण्याची तरतूदराकेश घानोडे नागपूर कोणत्याही मार्गाने वा पद्धतीने बोगस जात प्रमाणपत्र मिळविणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविणे अवैध आहे. अशा प्रकरणात केवळ प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात खासगी तक्रार दाखल करता येते, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. या निर्णयामुळे ‘महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागासवर्गीय जात प्रमाणपत्र कायदा-२०००’मधील तरतूद स्पष्ट झाली असून, यापूर्वी दाखल असंख्य एफआयआर रद्द करावे लागणार आहेत.न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांनी हा दिशादर्शक निर्णय दिला आहे. बोगस जात प्रमाणपत्र मिळविणाऱ्या व्यक्तींविरुद्ध राज्यभरातील पोलीस ठाण्यांत असंख्य एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. त्यावरून संबंधित पोलिसांनी न्यायालयांत दोषारोपपत्रेही दाखल केली आहेत. बोगस जात प्रमाणपत्र मिळवून संबंधित राखीव प्रवर्गाचे लाभ घेतल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीला किमान सहा महिने ते कमाल दोन वर्षांपर्यंतचा सश्रम कारावास किंवा किमान २ ते कमाल २० हजार रुपयांचा दंड किंवा दोन्ही शिक्षा सुनावण्याची तरतूद जात प्रमाणपत्र कायद्याच्या कलम ११(१)मध्ये करण्यात आली आहे. तसेच, जात पडताळणी समिती किंवा समितीद्वारे प्राधिकृत अधिकारी लेखी तक्रार करीत नाही तोपर्यंत कोणत्याही न्यायालयाने या गुन्ह्याखाली दाखल कोणत्याही तक्रारीची दखल घेऊ नये, असे कलम ११(२)मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. यावरून जात पडताळणी समिती किंवा समितीद्वारे प्राधिकृत अधिकारीच संबंधित व्यक्तीविरुद्ध न्यायालयात खासगी तक्रार दाखल करू शकत असल्याचे व पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्याची कायदा परवानगी देत नसल्याचे सिद्ध होते, असा खुलासा उच्च न्यायालयाने केला आहे. याशिवाय कायद्यातील कलम १०(१)अनुसार जात प्रमाणपत्र बोगस आढळून आल्यास संबंधित व्यक्तीला आरक्षित प्रवर्गातून मिळणारे सर्व लाभ मागे घेता येतात आणि संबंधित व्यक्तीला विद्यार्थी असल्यास शिक्षणापासून व शासकीय नोकरदार असल्यास नोकरीपासून वंचित करता येते, असेही निर्णयात नमूद करण्यात आले आहे.पाच अर्जदारांविरुद्धचे एफआयआर रद्दबोगस जात प्रमाणपत्र प्रकरणातील एफआयआर व दोषारोपपत्रे रद्द करण्यासाठी पाच व्यक्तींनी उच्च न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल केले होते. सर्व अर्जदारांना अनुसूचित जमाती प्रवर्गातील जात प्रमाणपत्र जारी करण्यात आले होते. परंतु, अनुसूचित जमाती जात पडताळणी समितीपुढे अर्जदारांना अनुसूचित जमातीच्या चालीरीती व परंपरा सिद्ध करण्यात अपयश आले. यामुळे समितीने अर्जदारांना अनुसूचित जमाती प्रवर्गातून मिळणारे लाभ काढून घेतले. यानंतर समितीच्या निर्देशावरून अर्जदारांविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आले होते. उच्च न्यायालयाने कायद्यातील तरतुदी लक्षात घेता अर्जदारांविरुद्धचे एफआयआर रद्द केले आहेत.