बुटीबाेरी व खापा (ता. सावनेर) नगर परिषद प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर पडताना मास्कचा वापर करण्याचे वारंवार आवाहन केले. मात्र, काही नागरिक याला सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याचे आढळून आले. नागरिकांचा हा हलगर्जीपणा काेराेनाच्या पथ्यावर पडणारा असल्याने प्रशासनाने दंडात्मक कारवाई करायला सुरुवात केली. या माेहिमेंतर्गत बुटीबाेरी शहरातील मुख्य मार्ग, पाेलीस ठाणे चाैक व इतर महत्त्वाच्या ठिकाणी नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात मास्क न वापरणाऱ्या १२० नागरिकांवर कारवाई करीत त्यांच्याकडून ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या माेहिमेत नगराध्यक्ष बबलू गाैतम, पालिकेचे मुख्याधिकारी राहुल परिहार, मीलन पाटील, समीर गणवीर, आनंद नागपुरे, सुभाष श्रीपदवार, विशाल दुधे, विक्की ठाकरे, दुर्गेश खडकतर, मुख्तार सैयद आदी सहभागी झाले हाेते.
खापा शहरातील मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याची माेहीम राबविली जात आहे. स्थानिक पालिका प्रशासन मास्क न वापरणारे व बाजार किंवा गर्दीच्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करीत आहे. खापा शहरातील या माेहिमेत पालिकेच्या मुख्याधिकारी डाॅ. ऋचा धाबर्डे, कर्मचारी सागर पहाडे, अनिल काेंडे, अमाेल साेनसरे, धनंजय ढाेले, तुषार सुखदेवे, गिरीश माेरे, कपिल निनावे, नीलेश रेतवकर, विजय ठेंगडी, अनुप लखपती, हरीश काेल्हे, चंद्रशेखर तायवाडे, अरुण तायवाडे आदी सहभागी झाले आहेत.
...
दंडाची रक्कम
या माेहिमेंतर्गत मास्क न वापरणाऱ्यांसाेबतच बाजार व गर्दीच्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मास्क न वापरणऱ्यांवर प्रत्येकी ५०० ते १,००० रुपये तर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर १,००० ते २,००० हजार रुपयांचा दंड ठाेठवला जात आहे.