शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अयोग्य सल्लागारांमुळे आर्थिक धोरण अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 01:35 IST

पंतप्रधानांपासून ते विविध मंत्र्यांचे सल्लागारच अयोग्य व अपात्र आहेत. विदेशातून शिकून आलेल्या या सल्लागारांना देशातील मूळ समस्यांची माहितीच नाही.

ठळक मुद्देभारतीय मजदूर संघाचा केंद्र सरकारवर आरोप : रोजगारनिर्मितीची घोषणा ‘जुमला’च ठरली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधानांपासून ते विविध मंत्र्यांचे सल्लागारच अयोग्य व अपात्र आहेत. विदेशातून शिकून आलेल्या या सल्लागारांना देशातील मूळ समस्यांची माहितीच नाही. मात्र त्यांच्यामुळे केंद्र शासनाचे आर्थिक धोरण अपयशी ठरत असून ते बदलण्याची नितांत आवश्यकता आहे, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत भारतीय मजदूर संघातर्फे मांडण्यात आली आहे. देशात गरिबी, बेरोजगारी यांचे प्रमाण वाढतच असून रोजगारनिर्मितीची घोषणा एक ‘जुमला’च ठरली असल्याचा आरोप करत ‘भामसं’ने केंद्र सरकारला घरचाच अहेर दिला आहे.भारतीय मजदूर संघामध्ये केंद्राच्या कामगार धोरणांविरोधात नाराजीचा सूर आहे. केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात ‘भामसं’तर्फे १७ नोव्हेंबर रोजी दिल्लीत संसदेसमोर निदर्शने करण्यात येणार आहे. या मोर्चाची तयारी व नियोजन यांची रूपरेषा ठरविण्यासाठी नागपुरात ६ व ७ आॅक्टोबर रोजी अखिल भारतीय पदाधिकारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने आयोजित पत्रपरिषदेला ‘भामसं’चे राष्ट्रीय महामंत्री विजेश उपाध्याय यांनी संबोधित केले. आपल्या देशाची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित आहे. त्यामुळे तिला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मात्र जमिनीवरील स्थिती माहितीच नसलेल्या सल्लागारांची सगळीकडे भरती झाली आहे. त्यामुळे नीती आयोगदेखील चुकीच्या दिशेने जात आहे. दुसºया देशाची अर्थव्यवस्था ‘कॉपी’ करणे थांबविले पाहिजे, असे म्हणत उपाध्याय यांनी वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावर निशाणा साधला. निवडणुकांच्या अगोदर रोजगारनिर्मितीचे मोठमोठे दावे करण्यात येतात. मात्र त्यातदेखील अपयश आले. रोजगारनिर्मिती, गरिबी हटाओ या गोष्टी निवडणुकांच्या प्रचारापुरत्याच मर्यादित ठरतात. देशाची आर्थिक संपदा वाढत असली तरी त्याचा लाभ निवडक लोकांनाच मिळत आहे. सरकार कामगारक्षेत्रातील ९२ टक्के लोकांच्या हिताकडे दुर्लक्ष करत असल्याचे देखील ते म्हणाले. पत्रपरिषदेला राष्ट्रीय सचिव नीता चौबे, सुधीर बुरडे, विदर्भ प्रदेश अध्यक्ष रमेश पाटील, महामंत्री अशोक भुताड, गजानन गटलेवार, सुरेश चौधरी, रमेश बल्लेवार उपस्थित होते.बहुराष्ट्रीय कंपन्यांना देश विकण्याचा डावदेशात सुधारणांच्या नावाखाली वर्तमान प्रणालीमध्ये अनेक बदल करण्यात येत आहेत. मात्र या सुधारणा अपयशी ठरत आहेत. अनेक ठिकाणी खासगीकरणाचा घाट घालण्यात येत आहे. खासगी व बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हातात कारभार देऊन देश विकण्याचाच हा डाव तर नाही ना, असा प्रश्न यावेळी विजेश उपाध्याय यांनी उपस्थित केला.सरकारच करीत आहे नियमांचे उल्लंघनदेशात गेल्या ७० वर्षांपासून रोजगाराचे धोरण तयार करण्यात आलेले नाही. ९३ टक्के लोक असंघटित क्षेत्रातील आहेत. उर्वरित ७ टक्क्यांधील ६७ टक्के रोजगार हे कंत्राटी पद्धतीचे आहेत. देशात कंत्राट नियमन कायदा असताना सरकारकडून त्याचे उल्लंघन होत आहे. सरकारच्या उदासिनतेमुळे कोट्यवधी कामगार हक्काचे वेतन व भत्ते यांना वंचित आहेत, असा आरोप उपाध्याय यांनी केला.या कारणांसाठी दिल्लीत आंदोलनसार्वजनिक क्षेत्रातील निर्गुंतवणुकीला ‘भामसं’तर्फे अगोदरच विरोध करण्यात आला आहे. सोबतच समान कामगार कायद्याची अंमलबजावणी करत समान वेतन, कामगारांना सामाजिक सुरक्षा इत्यादी मागण्यादेखील आहेत. केंद्र शासनाने कामगारांच्या हिताची भूमिका घ्यावी, यासाठी १७ नोव्हेंबर रोजी निदर्शने करण्यात येतील. याला सुमारे दीड ते पावणेदोन लाख कार्यकर्ते उपस्थित राहतील.