शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर विद्यापीठ-सहसंचालकांचा समेट

By admin | Updated: February 24, 2016 03:15 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रलंबित ‘सेवार्थ’ प्रणालीचे काम लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

‘सेवार्थ’साठी एकत्र काम करणार : विद्यापीठातील बैठकीत निर्णयनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रलंबित ‘सेवार्थ’ प्रणालीचे काम लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. हे काम अनेक दिवसांपासून अडकले असल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून नागपूर विद्यापीठातील ९९७ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन सामान्य निधीतूनच होत आहे. हे काम लवकर व्हावे यासाठी उच्चशिक्षण विभागाच्या सहसंचालक डॉ. अंजली रहाटगावकर यांनी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांची विद्यापीठात भेट घेतली. या कामासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याला दोघांनीही मान्यता दिली. ‘लोकमत’ने कर्मचाऱ्यांच्या हितासंदर्भातील हा मुद्दा सातत्याने लावून धरला होता, हे विशेष.राज्यातील विद्यापीठांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पगार सेवार्थ प्रणालीद्वारे करण्याचा निर्णय उच्च शिक्षण विभागाने घेतला. त्यानुसार उच्च शिक्षण सहसंचालकांनी मागवलेली कर्मचारी व अधिकाऱ्यांची माहिती कागदपत्रांसह विद्यापीठाने कळविणे अपेक्षित होते. यात अगदी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपासूनच्या सखोल माहितीचा समावेश होता. परंतु ही माहिती तसेच कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या ‘सर्व्हिस बुक’ची तपासणी पूर्ण झालेली नाही. यासंदर्भात विद्यापीठाने एका ‘एजन्सी’ला हे काम दिले होते. परंतु त्यांनी हे काम पूर्ण केले नाही. अखेर विद्यापीठातील कर्मचाऱ्यावर याची जबाबदारी देण्यात आली आहे. कर्मचारी संख्या मोठी असल्यामुळे संबंधित काम पूर्ण व्हायला दोन ते तीन महिने लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.विद्यापीठाचे ‘सेवार्थ’चे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी मुंबईतून विशेष पथक नागपुरात पाठविण्यासाठी उच्चशिक्षण विभागाने मान्यता दिली. दरम्यान, डॉ. रहाटगावकर यांनी मंगळवारी सकाळी कुलगुरूंची विद्यापीठात भेट घेतली व ‘सेवार्थ’च्या मुद्यावर चर्चा केली. ‘सेवार्थ’संदर्भात विद्यापीठाने ८० मुद्दे असलेला प्रत्येक कर्मचाऱ्याचा ‘आॅनलाईन’ अर्ज भरला. परंतु यासोबत आणखी एक १२ मुद्दे असलेला अर्जदेखील भरणे आवश्यक असल्याचे सहसंचालकांनी कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिले. संबंधित माहिती भरणे व कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करणे यासाठी विद्यापीठातील सहा ते सात कर्मचारी तसेच उच्चशिक्षण विभागातील सहा अधिकारी-कर्मचारी एकत्रितपणे काम करतील, असे ठरविण्यात आले. याशिवाय दोन तांत्रिक तज्ज्ञदेखील या कामात नेमण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.(प्रतिनिधी)