शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर बंद वसतिगृहाचे उघडले कुलूप

By admin | Updated: July 13, 2016 03:31 IST

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) १५ कोटी खर्चून बांधण्यात आलेले वसतिगृह फर्निचर

मेयोतील १५ कोटींचे वसतिगृह : ३९० विद्यार्थी घेणार आज ताबा नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) १५ कोटी खर्चून बांधण्यात आलेले वसतिगृह फर्निचर अभावी नऊ महिन्यांपासून कुलूपात होते. या संदर्भातील वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच अधिष्ठाता डॉ. मधुकर परचंड यांनी याची गंभीर दखल घेतली. त्यांनी वसतिगृहासाठी आहे ते फर्निचर उपलब्ध करून देऊन ३९० विद्यार्थ्यांना वसतिगृहांच्या खोल्यांचे वितरण केले. बुधवारी विद्यार्थी आपल्या खोल्यांचा ताबा घेणार आहेत. मेयोतील मुलांच्या वसतिगृहाच्या समस्यांना घेऊन मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने (एमसीआय) ताशेरे ओढल्यानंतर १५ कोटींच्या वसतिगृहाच्या बांधकामाला सुरुवात झाली. पाच मजलीच्या या वसतिगृहाचे मेयो प्रशासनाकडे हस्तांतरणही झाले. परंतु नऊ महिन्याचा कालावधी होत असताना विद्यार्थ्यांना या वसतिगृहाचा ताबा देण्यात आलेला नव्हता. फर्निचर नसल्याचे कारण देत मेयो प्रशासनाने ही इमारत कुलूपात बंद ठेवली होती. विशेष म्हणजे, वैद्यकीय शिक्षण विभागाने (डीएमईआर) वसतिगृहाचे फर्निचर व महत्त्वाच्या उपकरण खरेदीसाठी मार्च २०१६ मध्ये २० कोटींचा निधी दिला. मेयो प्रशासनाने हा निधी नागपूर सुधार प्रन्यासकडे (नासुप्र) वळता केला. या निधीतून नासुप्रला साडेसहा कोटी रुपयांचे फर्निचर घेण्याची मान्यता आहे. या संदर्भात नुकतीच निविदा काढण्यात आली असून सप्टेंबर महिन्यापर्यंत फर्निचर येण्याची शक्यता असल्याचे नासुप्रचे म्हणणे आहे. तोपर्यंत विद्यार्थ्याना जुन्याच वसतिगृहात दिवस काढावे लागणार होते. या संदर्भातील ‘ मुलांचे वसतिगृह सुरू होणार सप्टेंबरमध्ये!’ या मथळ्याखाली ५ जुलै रोजी वृत्त प्रसिद्ध होताच मेयो प्रशासनाने याला गंभीरतेने घेतले. नवे फर्निचर येईल तेव्हा येईल, परंतु तूर्तास आहे ते फर्निचर उपलब्ध करून वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय अधिष्ठाता डॉ. परचंड यांनी घेतला. त्यानुसार गेल्या आठवड्यापासून वसतिगृहातील खोल्यांचे वितरण सुरू करण्यात आले. बुधवारी विद्यार्थी आपल्या खोल्यांचा ताबा घेतील, अशी माहिती, डॉ. परचंड यांनी दिली. (प्रतिनिधी)