शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सिलींगच्या जमिनीसाठी १६ वर्षांपासून लढा

By admin | Updated: December 20, 2014 02:36 IST

शासनाने १९९८ मध्ये २ एकर सिलींगची जमीन देण्याची घोषणा केली. जमिनीचा सातबाराही दिला. परंतू सातत्याने १६ वर्षे लढा देऊनही जमीन काही मिळाली नाही.

दयानंद पाईकराव नागपूर शासनाने १९९८ मध्ये २ एकर सिलींगची जमीन देण्याची घोषणा केली. जमिनीचा सातबाराही दिला. परंतू सातत्याने १६ वर्षे लढा देऊनही जमीन काही मिळाली नाही. त्यामुळे हताश झालेले प्रल्हाद महादेव भलावी हे १६ वर्षांपासून जमीन मिळेल या आशेपोटी शासनाचा आणि तहसिल कार्यालयाचा उंबरठा झिजवित आहेत.किसान अधिकार अभियानाच्या मोर्चात प्रल्हाद महादेव भलावी (६५) रा. पळसगाव ता. देवळी जिल्हा वर्धा हे सामील झाले आहेत. प्रल्हाद यांची पत्नी छबुबाई यांच्या नावाने शासनाने १९९८ मध्ये २ एकर सिलींगची जमीन देण्याची घोषणा केली. शेतीचा सातबाराही त्यांना देण्यात आला. परंतु प्रत्यक्षात जमिनीचे वाटप केले नाही. मागील १६ वर्षांपासून ते शासनाकडे आणि तहसिल कार्यालयात जमीन मिळावी म्हणून पाठपुरावा करीत आहेत. प्रल्हाद भलावी यांच्या कुटुंबात पत्नी छबुबाई आणि एक मुलगा आहे. जमीन नसल्यामुळे त्यांना, त्यांची पत्नी आणि मुलाला मजुरी करण्याची पाळी आली आहे. परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांच्या मुलाला शिक्षण घेता आले नाही. रोजमजुरी करून ते आपली उपजीविका भागवित आहेत. पळसगाव पासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या आगरगाव येथे त्यांना जमीन मिळणार होती. मागील वेळी त्यांनी ७२ तास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. त्यावेळी त्यांना ६ महिन्यात जमीन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेली ६ महिन्यांची मुदतही संपली. त्यांचा हा लढा मागील १६ वर्षांपासून तसाच सुरू आहे. जमीन मिळेल आणि आपल्या मागील रोजमजुरीची कटकट बंद होईल या आशेने ते शासनाकडे आपली फिर्याद घेऊन मोर्चात सहभागी झाले आहेत.