शहरं
Join us  
Trending Stories
1
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
2
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
3
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
4
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
5
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
6
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
7
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
8
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
9
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
10
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
11
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
12
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
13
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
14
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
15
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
16
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
17
जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

विद्यार्थ्यांच्या मनात भीती

By admin | Updated: August 14, 2016 02:36 IST

नागपूर विद्यापीठातील काही प्राध्यापक याच्या समर्थनात नव्हते. यामुळे वेळापत्रक बिघडेल तसेच

नागपूर : नागपूर विद्यापीठातील काही प्राध्यापक याच्या समर्थनात नव्हते. यामुळे वेळापत्रक बिघडेल तसेच ‘चॉईस’ फार जास्त असल्यामुळे ते विषय शिकवायचे कसे असा त्यांचा प्रश्न होता. परंतु विद्यापीठ अनुदान आयोगाचेच निर्देश होते. त्यामुळे विद्यापीठाने या प्रणालीला डोळ्यासमोर ठेवून पावले उचलण्यास सुरुवात केली.मागील वर्षीपासून विद्यापीठाने विज्ञान शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांना ही प्रणाली लागू केली. पहिल्या दोन सत्रांची परीक्षा ही कुठल्याही अडथळ्यांविना झाली. ही प्रणाली जरी मागील वर्षीपासून लागू झाली असली तरी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना आवडता विषय तिसऱ्या सत्रापासून निवडता येणार आहे. तिसऱ्या सत्रातील विद्यार्थ्यांना विद्यापीठाने त्यांचा ‘चॉईस’ कळविण्यास सांगितले होते. ‘चॉईस बेस्ड क्रेडिट’ प्रणालीच्या नियमांनुसार विद्यार्थी ‘फाऊंडेशन कोर्स’ म्हणजेच आवडत्या विषयासाठी कुठल्याही विद्याशाखेतील विषयाची निवड करू शकत होते. परंतु प्रत्यक्षात संपूर्ण विद्यापीठातील एकाही पदव्युत्तर विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्याशाखेतील किंवा दुसऱ्या अभ्यासक्रमातील विषयाची निवड केलेली नाही. सर्वांनीच आपल्याच अभ्यासक्रमातील ‘आॅप्शनल’ विषय निवडला आहे. एखाद्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना दुसऱ्या अभ्यासक्रमातील विषय शिकण्याची अनेकदा इच्छा असते. परंतु नागपूर विद्यापीठाचा विस्तार फार मोठा आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना ‘फाऊंडेशन कोर्स’चा अभ्यास करण्यासाठी दुसरा विभाग किंवा महाविद्यालयात जावे लागणार आहे. यात त्यांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे. शिवाय इतर विभागात गेल्यावर ‘फाऊंडेशन कोर्स’ शिकविण्याची काय सोय आहे याची बहुतांश विद्यार्थ्यांना माहिती नाही. दुसऱ्या अभ्यासक्रमातील विषय निवडल्यानंतर शिकायलाच मिळाले नाही तर काय, ही भीती असल्यामुळेच विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमातील विषयांची निवड केली असावी, अशी माहिती एका विभागप्रमुखाने गोपनीयतेच्या अटीवर दिली.(प्रतिनिधी)