शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

एफडीएने धरले मेडिकलला वेठीस

By admin | Updated: October 31, 2015 03:15 IST

मेडिकलच्या रक्तपेढीतील त्रुटींवर बोट ठेवत कामकाज बंद ठेवण्याचा आदेश तिसऱ्या दिवशी शुक्रवारीही अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मागे घेतला नाही.

तिसऱ्या दिवशीही रक्तपेढीचे कामकाज ठप्प : दोन खासगी रक्तपेढ्यांना अभयनागपूर : मेडिकलच्या रक्तपेढीतील त्रुटींवर बोट ठेवत कामकाज बंद ठेवण्याचा आदेश तिसऱ्या दिवशी शुक्रवारीही अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मागे घेतला नाही. एकीकडे मेडिकल त्रुटी दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत असताना एफडीए मात्र मेडिकलला वेठीस धरण्याचा क्रूर प्रकार करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सध्या मेडिकलकडे रक्तपिशव्यांचा मोजकाचा साठा असून तो केवळ गंभीर रुग्णांसाठीच उपयोगात आणला जात आहे. एफडीएने २३ जून रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) रक्तपेढीची तपासणी करीत रक्तपेढीची अयोग्य रचना, आरोग्यवर्धक नसलेले रक्त गोळा करण्याचे ठिकाण, अयोग्य पद्धतीने होत असलेले रक्तपिशव्यांवरील ‘लेबलिंग’ व ‘एलायझा रिडर’मशीनमधील दोष, सेल्स कॉऊंट मशीन, कोअ‍ॅग्युलो मीटर आणि पी.एच. मीटर मशीन नसल्याच्या प्रमुख त्रुटी काढत कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मेडिकल प्रशासनाने त्यांच्या पातळीवर जे शक्य आहे, त्या सर्व त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला. यात एफडीएने सांगितल्याप्रमाणे ‘लेबलिंग’ची पद्धत बदलविली. रक्त गोळा करण्याचे ठिकाणाच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले. रक्तपेढीतील रचनेत बदल आणि लाखो रुपये किमतीच्या मशीन खरेदी करण्याचा प्रस्ताव संबंधित विभागाला पाठविले. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यात एफडीएच्या निरीक्षकाने पाहणी केली त्यावेळी त्यांनी झालेल्या बदलीवर समाधान व्यक्त केले. असे असतानाही लाखो रुपये किमतीची मशीन खरेदीवर अवलंबून असलेली ‘क्वालिटी कंट्रोल प्रयोगशाळा’ नसल्याचे कारणे देत बुधवारी अचानक रक्तपेढीचे कामकाज बंद ठेवण्याचे आदेश औषध प्रशासनाचे सहआयुक्त मोहन केकतपुरे यांनी दिले.