शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

फेटरी हे देशातील ‘मॉडेल’ गाव व्हावे

By admin | Updated: September 14, 2016 03:12 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेले फेटरी हे गाव देशातील ‘मॉडेल व्हीलेज’ व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येईल,

अमृता फडणवीस : सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया संयंत्र बसविणार, १०० टक्के हागणदारी मुक्त गावनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेले फेटरी हे गाव देशातील ‘मॉडेल व्हीलेज’ व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मंगळवारी फेटरी येथील ग्रामस्थांना दिली. फेटरीच्या बार्बरा बहुउद्देशीय पॉलिटेक्निक विद्यालयाच्या सभागृहात त्यांनी योजनाचा आढावा घेतला. याप्रसंगी त्यांनी ही ग्वाही दिली. आमदार समीर मेघे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, पंचायत समिती सभापती नम्रता राऊत, सरपंच ज्योती राऊत, उपसरपंच प्रशांत पवार, मुख्य कार्यपालन अधिकारी कादंबरी बलकवडे, जिल्हा नियोजन अधिकारी कृष्णा फिरके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. अमृता फडणवीस म्हणाल्या, फेटरीला मॉडेल व्हीलेज बनविताना स्वच्छता, मुलीचे शिक्षण, सांडपाणी व्यवस्थापन, बेरोजगारांना विविध कंपनीच्या मागणीनुसार कौशल्य शिक्षण याकडे विशेष लक्ष देण्यात येईल. आपल्या गावात सर्व सोईसुविधा निर्माण व्हाव्यात अशी परिस्थिती आपण निर्माण करावी. जेणेकरून आपल्याला शहरात जाण्याची आवश्यकता भासू नये असे सांगत या सर्व बाबीची उपल्बधता करून देण्यासाठी तसेच कामे पूर्ण होण्यासाठी दर आठड्यास या गावास भेट देणार असल्याचे त्यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केले. आ. मेघे यांनी फेटरी गावाचे येत्या काही महिन्यांत रूप पालटेल, अशा पद्धतीने येथील विकासकामे करण्यात येईल. त्यासाठी ग्रामस्थांनीही मदत करावी, असे आवाहन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी आशा पठाण, ग्रामपंचायतचे सदस्य मुकेश ढोमणे, प्रकाश लंगडे, योगिता परतेकी, रेखा ढोणे, किरण ताजणे, प्रभावती लंगडे, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक शशांक दाभोळकर, जिल्हा परिषदेचे विविध विभागाचे प्रमुख व गावातील नगारिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी) सामाजिक जाणिवेतून केला ‘रॅम्पवॉक’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ‘न्यूयॉर्क फॅशन वीक’मध्ये ‘रॅम्पवॉक’ केला होता. हा ‘रॅम्पवॉक’ सामाजिक भावनेतून केला होता. मुलींच्या शिक्षणाविषयी जागृती निर्माण करणे हा त्यामागचा उद्देश होता, असे अमृता फडणवीस यांनी स्पष्ट केले. शेतकरी, कामगार यांच्या मुलामुलींनी तयार केलेल्या ‘हँडलूम’ वस्त्रांचे ‘प्रमोशन’ होते. सामाजिक कार्यासाठी पुढेदेखील असे प्रस्ताव आल्यास नक्कीच विचार करु, असेदेखील त्यांनी सांगितले.