शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:सोबत कुटुंबाच्याही जीवनाचा मार्ग सुकर करणारा बाप ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:06 IST

निशांत वानखेडे नागपूर : चित्रपटातील कथा या समाजातूनच येतात असे म्हटले जाते. अशीच एक कथा मनीषनगरच्या रमेश नाईकांच्या संघर्षातून ...

निशांत वानखेडे

नागपूर : चित्रपटातील कथा या समाजातूनच येतात असे म्हटले जाते. अशीच एक कथा मनीषनगरच्या रमेश नाईकांच्या संघर्षातून मिळाली. आधीच अठरा विश्वे दारिद्र, त्यात वडिलांचे छत्र हरपले. अशात मुलांसाठी धडपडणाऱ्या आईच्या संघर्षाचे ते वाटेकरी झाले. लहानग्या बहिण-भावासाठी मेहनत घेताना स्वत:च्या यशाचा मार्ग सुटू दिला नाही. रोजीने चपराशी लागत त्याच ऑफिसमध्ये अधिकारी होत मुलांसह कुटुंबाच्या यशाची वाट सुकर करीत ‘बाप’ होण्याचे कर्तव्य पार पाडले. मोठ्यांच्या संघर्षाचे किस्से ऐकताना सामान्यांच्या संघर्षाची ही गाथा चित्रपटातील पात्रांपेक्षा कमी नाही.

रमेश नाईक ११ वर्षाचे असताना वडिलांचे निधन झाले. तेव्हा हे कुटुंब भांडेप्लॉट भागात राहत होते. मोठ्या बहिणीसह चार भावंडांना सांभाळण्यासाठी बांधकामावर मोलमजुरी करणाऱ्या अशिक्षित आईचा संघर्ष ते पाहात होते. शिक्षणाची आवड असल्याने मौद्याजवळच्या गावातील मामाकडे राहून १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते परतले. ११ वीमध्ये प्रवेश घेतला व आईसाेबत कामही सुरू केले. दारू दुकानात काम केले, भाजी बाजारात राबले, त्यावेळी भरणाऱ्या सक्करदरा बैलबाजार व गाेकुळपेठ बाजारात सायकल स्टॅंडवर ३ रुपये राेजीने काम केले. वडील गेल्यापासून ६-७ वर्षे किती दिवस उपाशी गेले, किती हालअपेष्टा भाेगल्या याची मोजदाद नव्हती.

अशात महाराष्ट्र स्टेट काे-आप. बॅंकेत उन्हाळ्यात कुलरमध्ये पाणी भरण्याचे काम मिळाले. १२ उत्तीर्ण केली अन याच ठिकाणी राेजंदारीवर चपराशी म्हणून नाेकरी मिळाली आणि मग परिस्थिती पालटायला लागली. वर्षभरानंतर नियमितपणे नियुक्ती झाली. रमेश यांनी शिक्षण साेडले नाही. बी.काॅमची पदवी करताना सकाळी काॅलेज आणि दिवसा बॅंकेत नाेकरी अशी धडपड सुरू हाेती. बी.काॅम. अन् एम.काॅम.ही झाले आणि याच बॅंकेत क्लर्क म्हणून प्रमाेशन झाले. शिक्षण सुरूच हाेते. अर्थशास्त्रात एमए करण्यासह बॅंकिंगच्या वेगवेगळ्या परीक्षा उत्तीर्ण केल्या आणि ज्युनियर ते ग्रेड-१ अधिकारीपर्यंत मजल मारली. ट्रेनिंग काॅलेजमध्ये प्राध्यापक ते नागपूरचे विभागीय अधिकारी नियुक्ती मिळाली. २०१२ साली एका अपघातामुळे त्यांनी निवृत्ती पत्करली.

हे सगळे करताना भावाचे शिक्षण व शिक्षक म्हणून नाेकरी आणि बहिणीचे बीएड.पर्यंत शिक्षण करून लग्न करून देण्यापर्यंतचे कर्तव्य पार पाडले. स्वत:चेही लग्न केले. आज त्यांचा मुलगा स्वप्निल बैद्यनाथ कंपनीच्या दुबई ब्रॅंचमध्ये अकाऊंटंट आहे तर लहान मुलगी राधा एम.डी. अंतिम वर्षाला आहे. मेयाेच्या काेराेना वाॅर्डात तिने सेवाही दिली आहे. ही सारी धडपड जगणारी ८७ वर्षाची त्यांची आई आजही साेबत आहे. इतका संघर्ष करून कुटुंबाला यशापर्यंत पाेहचवित मिळालेले सुखाचे आयुष्य किती समाधानी असू शकते, ते रमेश नाईक या बापाला बघून कळते. परिस्थितीला घाबरू नका, एक दिवस यशस्वी झाल्यानंतर आयुष्यात केलेला संघर्ष पुढे तुमच्या चेहऱ्यावर आनंद फुलविताे.