शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मोलमजुरी करणाऱ्या बापाने मुलांना केले उच्चशिक्षित ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST

गणेश हूड नागपूर : कुटुंबाच्या गरजा, मुलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वत: उन्हाचे चटके सहन करणारा बाप असतो. आपल्या वेदना ...

गणेश हूड

नागपूर : कुटुंबाच्या गरजा, मुलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वत: उन्हाचे चटके सहन करणारा बाप असतो. आपल्या वेदना लपवून कुटुंबाला खंबीर आधार देणारा बाप असतो. समाजातील अशा लाखो बापांपैकी एक नाव म्हणजे रेवानाथ कुरस्कर यांचेसुद्धा आहे. मोलमजुरी करताना लहान-मोठ्या व्यवसायांचा आधार घेत मुलगा व चार मुलींना उच्चशिक्षित करताना संयुक्त कुटुंबात प्रत्येक सदस्याची काळजी घेण्याचे कर्तव्य त्यांनी प्रामाणिकपणे निभावले.

रेवानाथ यांचे वडील बकाराम हे मिल कामगार होते. त्यामुळे आलेले दारिद्र्याचे जीवन त्यांनीही पाहिले. घरातील मोठा मुलगा असल्याने दोन भावंड व तीन बहिणींसाठी बापाचे कष्ट अर्धे करण्याची जबाबदारी त्यांच्यावरही आली आणि ते त्यांनी स्वीकारलीही. लहान-मोठी कामे करून कुटुंबास हातभार लावला. त्यांना व्यवसाय करण्याची इच्छा होती, पण भांडवल नव्हते. याही परिस्थितीत कधी पतंग बनविणे, मांजा तयार करून विकणे त्यांनी सुरू केले. अशात त्यांना एका रेशनच्या दुकानात नोकरी मिळाली आणि त्यांच्या पायपिटीला स्थिरता आली. मालकानेही त्यांच्या प्रामाणिकपणाचे बक्षीस म्हणून दुकानाची जबाबदारी त्यांच्यावर टाकली.

याच आधारावर दोन्ही भावंडांना रोजगार देऊन स्थिर केले व बहिणींच्या लग्नात सिंहाचा वाटा उचलला. लग्न झाल्यानंतर त्यांच्या पत्नीची भक्कम साथ त्यांना मिळाली. मुलगा, मुलगी भेद न ठेवता चारही मुलींना उच्च शिक्षण दिले. मोठी मुलगी भूमिता सावरकर अ‍ॅडव्होकेट झाली. दुसरी तेजस्विनी प्राध्यापक झाली. तिसरीही तिच्या घरी सुखी आहे तर चौथी पूनम फूड अ‍ॅन्ड न्यूट्रिशनमध्ये एम.एस्सी. झाली. मुलगा एमबीए झाला असून, अभ्यासिका चालवितो. त्यांच्या मेहनतीमुळे समाजाच्या वेगवेगळ्या संस्थांची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविली व त्यांनीही नेटाने पार पाडली. त्यांच्या वाटचालीत समाजाचा मोठा आधार मिळाल्याचे ते सांगतात. रेवानाथ यांनी वयाच्या १३ व्या वर्षापासून उपसलेले कष्ट आज फळाला आले असून, त्याचे समाधान कुटुंबातील प्रत्येक सदस्यात आणि बापाच्या संघर्षाचा अभिमान मुलांच्या चेहऱ्यावर दिसतो.