शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी म्हणाले, श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस आली; आता संजय शिरसाटांचा यू-टर्न; म्हणाले...
2
“कुठूनही पैसे आणा, पण शेतकरी कर्जमुक्ती करा, सातबारा कोरा करा”; मनसेचा बच्चू कडूंना पाठिंबा
3
“ठाकरे बाहेरचे आहेत, महाराष्ट्राने स्वीकारले अन् आता ते...”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
Video: 'महाराष्ट्रातून कोण आलंय? इकडे ये...', नाशिकच्या तरुणासोबत हरयाणात काय घडले? पाहा...
5
Video - हृदयद्रावक! लेक्चरमध्ये विपरित घडलं, शिक्षकाला मृत्यूने गाठलं अन्...; 'मृत्यू' कॅमेऱ्यात कैद
6
रुग्णालयात सुरू होती शस्त्रक्रिया तेवढ्यात फॉल्स सिलिंग तुटून ऑपरेशन थिएटरमध्ये पडला कुत्रा, त्यानंतर...  
7
नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकांकडून वरुण सरदेसाईंना धक्का; उपसभापती म्हणाल्या,'माझ्यावर का खेकसताय?'
8
TCS ची दिवाळी! अपेक्षांना मागे टाकत कमावला १२,७६० कोटींचा नफा, शेअरधारकांना किती लाभांश मिळणार?
9
महाकाय किंग कोब्रा सापाची महिला वन अधिकाऱ्याने केली सुटका, सचिन तेंडुलकरने केलं कौतुक
10
98%ने घसरून थेट 96 पैशांवर आला होता हा ज्वेलरी शेअर, आता 1800% ने वधारला; करतोय मालामाल!
11
"नितीश कुमार नाम सुनके फ्लावर समझे क्या; फ्लावर नहीं फायर है..." दोन्ही सलामीवीरांना धाडलं तंबूत
12
‘दिवसातून ३ तासच वीज येते, काही तरी करा’, उत्तरदाखल ऊर्जामंत्री जय श्रीराम म्हणाले आणि निघून गेले   
13
सावधान! स्क्रीन टाईम नाही तर पालकांकडून नकळत होणाऱ्या 'या' चुकांचा मुलांवर वाईट परिणाम
14
खळबळजनक! लेकीने आई आणि बॉयफ्रेंडच्या मदतीने केली वडिलांची हत्या, नंतर पाहिला चित्रपट
15
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
16
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, "हिंमत असेल तर…’’
17
LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का?
18
मराठी-हिंदी वादात शिल्पा शेट्टीची उडी, म्हणाली- "मी महाराष्ट्राची मुलगी, पण..."
19
अ‍ॅडवॉन्स सेफ्टी फीचर्स आणि लेटेस्ट टेक्नोलॉजी; प्रीमियम कारच्या खरेदीवर ३ लाखांची सूट!
20
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची न्यूझीलंड सफर! '#BeyondTheFilter' अनुभवासाठी भारतीयांनाही आमंत्रण

ट्रकच्या धडकेत वडिलांचा मृत्यू

By admin | Updated: February 25, 2016 03:16 IST

भरधाव ट्रकने आॅटोला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला तर आॅटोचालकासह एकूण पाचजण जखमी झाले.

मुलासह तीन मुली जखमी : वाडीत आॅटोला अपघातवाडी : भरधाव ट्रकने आॅटोला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला तर आॅटोचालकासह एकूण पाचजण जखमी झाले. ही घटना वाडी पोलीस ठाण्यांतर्गत एमआयडीसी टर्निंग टी - पॉर्इंटजवळ बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाला. त्याच्या मुलासह मुली जखमी झाल्या. तर पत्नीला काहीच दुखापत झाली नाही.झुम जानकी मंडल (४०, रा. काली मंदिरजवळ, मुंगेर शादीपूर, बिहार) असे मृताचे नाव आहे. जखमींमध्ये झुम यांचा मुलगा ओम मंडल, मुली प्रीती, रिया, मधू या चौघांसह आॅटोचालक फिरोज आमिर खान (२८, रा. हसनबाग, सक्करदरा) यांचा समावेश आहे. मंडल कुटुंबीय हे डिफेन्स, अंबाझरीत राहणाऱ्या सुमनकुमार रामस्वरूप मंडल यांच्याकडे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होते. यासाठी ते बर्डीहून एमएच-४९/ई-२४४७ क्रमांकाच्या आॅटोने डिफेन्सकडे निघाले. दरम्यान, अमरावतीकडून एमआयडीसीकडे जाणाऱ्या ट्रकने एमआयडीसी टी - पॉर्इंट येथे आॅटोला जबर धडक दिली. त्यात झुम मंडल यांचा मृत्यू जागीच झाला. तर अन्य चौघे जखमी झाले. अपघात झाल्यानंतर ट्रकचालक ट्रकसह तेथून पसार झाला. काही अंतरावर त्याने ट्रक सोडून पळ काढला. तो ट्रक एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतला. याप्रकरणी वाडी पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन राखुंडे करीत आहे. (प्रतिनिधी)