शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात आर्थिक संस्थांचे जाळे विणणार

By admin | Updated: December 28, 2014 00:39 IST

राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात आर्थिक संस्थांचे जाळे विणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांच्या प्रमुखांची लवकरच बैठक आयोजित केली जाईल,

देवेंद्र फडणवीस : बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेचे उद्घाटनवाडी : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात आर्थिक संस्थांचे जाळे विणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांच्या प्रमुखांची लवकरच बैठक आयोजित केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बँक आॅफ महाराष्ट्रच्या वाडी शाखेचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकेचे कार्यकारी संचालक आर. आत्मराम होते. प्रमुख अतिथी म्हणून आ. समीर मेघे, रिझर्व्ह बँकेचे क्षेत्रीय निदेशक जे. एम. जीवानी, क्षेत्र महाव्यवस्थापक पी. बी. अंभोरे, टी. व्ही. रमण मूर्ती उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, वाडी भागात व्यापार व उद्योग प्रगतिपथावर आहे. त्यामुळे या भागात बँक आॅफ महाराष्ट्रने शाखा सुरू करून ही कमी दूर केली आहे. ग्रामीण भागात बँकांचे जाळे विणल्यास शेतकऱ्यांना कर्जासाठी सावकारांकडे जावे लागणार नाही. त्यामुळे बँक व्यवस्थापनाने ग्रामीण भागात शाखा सुरू करण्यासंदर्भात गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. सध्या पुणे, ठाणे व मुंबई परिसरात बँकांमध्ये ६० टक्के गुंतवणूक होते. ती आता राज्याच्या इतर भागात होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे. ज्या भागात बँकांच्या शाखा मोठ्या प्रमाणात आहेत, त्या भागात शेतकरी आत्महत्या करीत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात बँकांच्या शाखा सुरू करण्यासाठी ठोस प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.आर. आत्मराम यांनी शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विकास योजनांमध्ये सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. पी. बी. अंभोरे यांनी प्रास्ताविकातून बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही खातेदारांना एटीएम कार्ड व पासबुकचे वितरण करण्यात आले. टी. व्ही. रमण मूर्ती यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)