शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातही शेतकऱ्यांनी दाखवली ताकद

By admin | Updated: June 1, 2017 18:29 IST

शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात वाकोडी या गावात धरणे आंदोलन करून शेतकऱ्यांनी आपणही आंदोलनात मागे नसल्याचे दाखवून दिले.

आॅनलाईन लोकमतनागपूर : विविध शेतकरी संघटनांच्या संयुक्त कृती समिती असलेल्या किसान क्रांती अंतर्गत आजपासून शेतकऱ्यांनी संप पुकारला. सातारा-सांगलीतील शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध व भाजीपाला फेकून पहिल्याच दिवशी आपली ताकद दाखविली. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. नागपूर व विदर्भात या आंदोलनाचे लोण उशिरा पोहोचल्याने संपूर्ण नागपूर जिल्ह्यात आंदोलनाची तीव्रता दिसून आली नाही. मात्र शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात वाकोडी या गावात धरणे आंदोलन करून शेतकऱ्यांनी आपणही आंदोलनात मागे नसल्याचे दाखवून दिले. पाटणसावंगी येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाकोडी या गावात शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात ग्राम पंचायतीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष राम नेवले यांच्या नेतृत्वातील या आंदोलनात अरुण केदार, राजू नागुलवार, अरविंद देशमुख, प्रभाकर काळे, ज्ञानेश वाकुडकर उपस्थित होते. वाकोडी या गावातील आशिष राऊत हे दुधाचा व्यवसाय करतात. आंदोलनादरम्यान त्यांनी दुधाची कॅन आंदोलन स्थळी जमिनीवर टाकून यापुढे आपण शहराला दूध पुरवठा करणार नाही, असा संकल्प केला. तसेच विनायक खोरगडे या शेतकऱ्याने भाजीपाला फेकून शहराला भाजीपाला न पाठविण्याचा निर्णय घेतला. हे आंदोलन केवळ शेतकऱ्यांचे आंदोलन असल्याने ते केवळ गावामध्येच केले जाईल, असे राम नेवले यांनी स्पष्ट केले.