शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांचे शुल्क माफ

By admin | Updated: June 7, 2017 02:12 IST

राज्यभरात शेतकरी आंदोलन तापलेले असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांना

नागपूर विद्यापीठाचा निर्णय : विद्यार्थी संघटनांची होती मागणी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यभरात शेतकरी आंदोलन तापलेले असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांना दिलासा देण्याचे ठरविले आहे. अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांचे सर्व शुल्क माफ करणार असून याबाबत व्यवस्थापन समितीच्या मान्यतेनंतर अधिसूचना जारी करण्यात येईल, अशी माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली. विदर्भातील शेतकऱ्यांची आत्महत्या अद्यापही थांबलेली नाही. आत्महत्या केलेल्या काही शेतकऱ्यांची मुले विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना विविध अडीअडचणींचा सामना करावा लागतो. अशा विद्यार्थ्यांचे विद्यापीठातील सर्व प्रकारचे शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थी संघटनांतर्फे होत होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेच्यावतीने याबाबत कुलगुरूंना मागील आठवड्यात निवेदनदेखील देण्यात आले होते. याबाबत कुलगुरूंना विचारणा केली असता आम्ही या मुद्यावर सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये यावर चर्चा करून त्वरित निर्णय घेण्यात येईल. जर एखादा विद्यार्थी विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसरात शिक्षण घेत असेल तर त्याचे सर्व शुल्क माफ करण्यात येईल, अशी त्यांनी माहिती दिली. महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा याबाबतीत अद्याप अधिसूचना जारी झालेली नाही. विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शुल्कमाफीबाबत हस्तक्षेप करणार नाही. संलग्नित महाविद्यालयांच्या प्रवेश शुल्काचे अधिकार हे महाविद्यालयांना असतात. त्यामुळे यासाठी महाविद्यालयांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन डॉ. काणे यांनी केले. संलग्नित महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या पाल्यांचे परीक्षा शुल्क हे विद्यापीठाकडे जमा होणार असल्याने ते माफ करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.