शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

३२.७६ कोटींची खोट्या इनपुट टॅक्स क्रेडिटची उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:09 IST

नागपूर : बोगस बिल तयार करून खोट्या इनपुट टॅक्स क्रेडिटची उचल करणारे उद्योजक आणि व्यावसायिकांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेंतर्गत केंद्रीय ...

नागपूर : बोगस बिल तयार करून खोट्या इनपुट टॅक्स क्रेडिटची उचल करणारे उद्योजक आणि व्यावसायिकांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेंतर्गत केंद्रीय जीएसटी गुप्तचर संचालनालयाच्या (डीजीजीआय) औरंगाबाद क्षेत्रीय युनिटने एमएस वेस्ट/स्क्रॅपचा व्यवसाय करणाऱ्या एका फर्मच्या दोन संचालकावर धाड टाकून अटक केली.

दोन्ही संचालकाने फर्मच्या माध्यमातून बोगस पावत्याद्वारे १७०.३५ कोटींचा व्यवहार करून ३२.७६ कोटींचा इनपुट टॅक्स क्रेडिटचा फायदा घेतला. दोन्ही संचालकानी कोणत्याही वस्तूंचा पुरवठा न करता बोगस बिलाच्या आधारावर खोटे आयकर विवरण दाखल केले आहे. या संदर्भात डीजीजीआयच्या औरंगाबाद क्षेत्रीय युनिटने ३ आणि ४ डिसेंबरला विविध ठिकाणी धाडी टाकल्या. या कारवाईत व्यवहाराच्या विविध नोंदी असलेली डायरी आणि शीट ताब्यात घेतल्या. खोटा व्यवहार करून ५ टक्के जीएसटी रेट अर्थात दोन्ही बाजूने २.५ टक्के कमिशन घेतल्याचे चौकशीदरम्यान आढळून आले. अशा प्रकारे या दोन्ही करदात्यांनी हजारो व्यवहार केले आहेत. चौकशीदरम्यान करदात्यांनी खोटे व्यवहार केल्याचे कबूल केले. कमिशन रकमेच्या बँक पेमेंटच्या आधारावर खोट्या व्यवहाराचा शोध घेण्यात येत आहे. करदात्यांनी बोगस पावत्यांच्या आधारे १८.६६ कोटी आणि १४.१० कोटींचे इनपुट टॅक्स क्रेडिट घेतल्याचे चौकशीत आढळून आले. यानुसार करदात्याने सीजीएसटी कायदा २०१७ चे उल्लंघन केले आहे.

दोन्ही संचालकाला ४ डिसेंबरला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायाधीशांनी दोघांनाही १९ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.