शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

ठगबाजाचा जामीन फेटाळला

By admin | Updated: December 14, 2015 03:20 IST

मोठ्या प्रमाणावर बेरोजगार युवकांना नोकऱ्यांचे बनावट नियुक्तीपत्र देऊन लुबाडणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील ..

नोकऱ्यांचे आंतरराज्यीय रॅकेटनागपूर : मोठ्या प्रमाणावर बेरोजगार युवकांना नोकऱ्यांचे बनावट नियुक्तीपत्र देऊन लुबाडणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील एका ठगबाजाचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. भालेराव यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. अवनित उपेंद्रसिंग (२७), असे या ठगबाजाचे नाव असून तो उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथील रहिवासी आहे. त्याला २५ नोव्हेंबर २०१५ रोजी अटक करण्यात आली होती. तो या संघटित टोळीत सावज हेरण्याचे आणि वसुली करण्याचे काम करायचा. ओडिशाच्या राऊरकेला येथील चैताली तपन मुखर्जी (२९) नावाची तरुणी या टोळीची सूत्रधार आहे. या टोळीत आणखी एक २२ वर्षांची तरुणी असून तिचे नाव आयुषी श्रीवास्तव असे आहे. भानुप्रतापसिंग (२६) रा. गोरखपूर आणि अरुण सातपुते हेही या टोळीतील सक्रिय सदस्य आहेत. हे आरोपी अद्यापही गवसले नाहीत. झिंगाबाई टाकळी येथील रहिवासी आशिष यशवंत डोंगरे (३४) यांच्या तक्रारीवरून या टोळीविरुद्ध गिट्टीखदान पोलिसांनी १८ मार्च २०१४ रोजी गुन्हा दाखल केला होता. अवनितसिंग याने आशिष डोंगरे यांचा मावस भाऊ चेतन पुरुषोत्तम रंगारी (३०) रा. न्यू ठवरे कॉलनी कामठी रोड याला हेरून चैताली मुखर्जी ही भुवनेश्वर येथील इंडियन आॅईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम, ओडिशा सचिवालय, टाटा प्रोजेक्ट, वेस्टर्न कोल फिल्ड आदी वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी लावून देते, असे सांगितले होते. आशिषने अवनितसिंग याला आपला साळा अश्विन चिंतामण बोरकर हा मेकॅनिकल इंजिनियर असून बेरोजगार असल्याचे सांगितले होते. यावर अवनितसिंगने अश्विनला इंडियन आॅईलमध्ये नोकरी लावून देता येईल असे सांगितले होते. त्याला ४५ हजार रुपये पगार मिळेल, भुवनेश्वर किंवा पॅराद्वीप येथे नेमणूक होईल, राहण्याची सोय राहील, एकूण खर्च ४ लाख रुपये खर्च येईल, असे सांगितले होते. सौदेबाजी होऊन ३ लाख ५० हजार रुपये देण्याचे ठरले होते. ६ आॅक्टोबर २०१३ रोजी आशिष डोंगरे यांनी अश्विनच्या नोकरीसाठी अवनितसिंगला आधी १ लाख ५० हजार रुपये दिले होते. अवनितसिंग याने अश्विनला भुवनेश्वर येथे बोलावून घेऊन चैतालीसोबत भेट घालून दिली होती. चैतालीने एका हॉटेलमध्ये अश्विनला अरुण सतपते नावाच्या इसमासोबत भेट घालून दिली होती. त्याने अश्विनची मौखिक मुलाखत घेतली होती. नोकरीचे आॅफर लेटर निघत असल्याचे सांगून त्याच्याजवळून पुन्हा २ लाख रुपये घेतले होते. आरोपी अवनितसिंगला या टोळीतील सर्वांची ठिकाणे माहीत असल्याने न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी काम पाहिले. सहायक पोलीस निरीक्षक एल. एस. तसरे हे या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत. (प्रतिनिधी)