शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दहशतविरोधी यंत्रणांच्या रडारवर क्रिप्टो करन्सीचे बनावट ॲप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:07 IST

महिनाभरात देशभरात २३३ प्रकरणे उजेडात : मोठ्या घडामोडींचे संकेत नरेश डोंगरे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बनावट ॲपच्या ...

महिनाभरात देशभरात २३३ प्रकरणे उजेडात : मोठ्या घडामोडींचे संकेत

नरेश डोंगरे ।

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : बनावट ॲपच्या माध्यमातून क्रिप्टो करन्सी एक्स्चेंजच्या नावाखाली शेकडो कोटींची रक्कम गिळंकृत करणाऱ्या ठगबाजांनी कोट्यवधी रुपये दहशतवाद्यांकडे वळते केल्याचा संशय आहे. हे अत्यंत संवेदनशील प्रकरण लक्षात आल्यानंतर तपास यंत्रणा सतर्क झाल्या असून लवकरच धमाकेदार कारवाई होणार असल्याची माहिती खास सूत्रांनी लोकमतला दिली आहे.

विशेष म्हणजे, विविध फसव्या ॲपच्या माध्यमातून शेकडो कोटी गोळा करणाऱ्यांपैकी काहींना उत्तराखंड पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यात महाराष्ट्राचेही कनेक्शन असल्याचे विश्वसनीय तेवढेच खळबळजनक वृत्त नाव न छापण्याच्या अटीवर शीर्षस्थ सूत्रांनी लोकमतला सांगितले आहे.

गेल्या काही वर्षांत पॉवर बँक, ईझी कॉईन, ईझि पॉईंट, फिश प्लस, सन फॅक्ट्री नावाने अँप सोशल प्लॅटफार्मवर वेगात चालत आहेत. बहुतांश ॲप चीनमधून तयार करण्यात आले असून ॲपच्या माध्यमातून शेकडो कोटींच्या उलाढालीचा आभास निर्माण करण्यात आला आहे. हे ॲप वापरणाऱ्यांना अल्पावधीत आपली रक्कम कशी दामदुप्पट होते, ते एजंटकडून सांगितले जाते. पैशाच्या लालसेने मायाजालात अडकलेल्यांची रक्कम घेऊन क्रिप्टो करन्सी एक्सचेंजचा गोरखधंदा चालविण्यात येतो. त्यासाठी ॲप संचालित करणाऱ्या ठगबाजांनी देशातील विविध प्रांतात एजंट नेमले आहेत. त्यांच्याच माध्यमातून गुंतवणूकदारांच्या रकमेची हेराफेर केली जाते. त्यांना प्रभावित करण्यासाठी कागदोपत्री नोंद असलेल्या बनावट कंपन्यांचे शेकडो कोटींच्या उलाढालीचे मायाजालही दाखविले जाते. आपली रक्कम अनेक पटीने वाढत असल्याचा आभास होत असल्याने आणि प्रारंभी छोटीमोठी रक्कम विड्रॉल करता येत असल्याने गुंतवणूकदार या फसवणुकीच्या जाळ्यात पुरता गुंतत जातो अन् लाखोंची रक्कम ठगबाजांच्या हवाली करतो. लाखो गुंतवणूकदार अशा पद्धतीने या मोहजालात अडकवून त्यांचे शेकडो कोटी रुपये या रॅकेटने स्वत:च्या खात्यात वळते करून घेतले आहेत. यातील कोट्यवधीं रुपये दहशतवादी संघटनांशी कनेक्ट असलेल्या संशयितांकडे वळते करण्यात आल्याची माहिती आहे. सूत्रांच्या मते ठगबाजाच्या खात्यात असलेले ३०० कोटी फ्रीज करण्यात आले आहे.

---

१२ राज्यात मायाजाल

ठगबाजीच्या या गोरखधंद्याचा छडा लागल्यानंतर उत्तराखंडच्या तपास यंत्रणा गतिमान झाल्या. त्यानंतर फसवणुकीची देशभरातील २३३ प्रकरणे पुढे आली. त्यात सर्वाधिक १७८ प्रकरणे तेलांगणातील आहेत. पश्चिम बंगालमधील १९, उत्तर प्रदेश १३, हरियाणा ५, तामिळनाडू ४, कर्नाटका ३, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा आणि उत्तराखंड प्रत्येकी २ (एकूण ८) आणि दिल्ली, बिहार तसेच चंदीगड मधील प्रत्येकी एका प्रकरणाचा खुलासा झाल्याची माहिती आहे.

----

विदेशी खाती अन् शेकडो सिम

अटक करण्यात आलेले आरोपी आणि बाहेर असलेल्या त्यांच्या साथीदारांनी ॲप चालविण्यासाठी, गुंतवणूकदारांकडून आलेली रक्कम स्वीकारण्यासाठी, ती विविध खात्यात वळती करण्यासाठी वेगवेगळ्या सिमकार्डचा वापर केला. त्यातील २०० वर सिमकार्डचे कनेक्शन संशयास्पद असून या सीमच्या चाैकशीतूनच विदेशी बँक खाती आणि दहशतवादी कनेक्शन उजेडात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

---