शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने वैश्विक नेते

By admin | Updated: October 24, 2015 03:26 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने वैश्विक नेते आहेत. त्यामुळे लंडनपासून टोकिओपर्यंत बाबासाहेबांचे नेतृत्व जगापुढे आणण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे,...

देवेंद्र फडणवीस : ड्रॅगन पॅलेसही होणार जागतिक दर्जाचे नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने वैश्विक नेते आहेत. त्यामुळे लंडनपासून टोकिओपर्यंत बाबासाहेबांचे नेतृत्व जगापुढे आणण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कामठी येथे ओगावा सोसायटीतर्फे ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्षस्थानी होते. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खासदार कृपाल तुमाने, थायलंडच्या राजकुमारी लुयांग राजादारासिरी, ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे उपस्थित होत्या. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या १२५ व्या जयंतीनिमित्त कामठी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र तसेच सभागृहाचे उद्घाटन, मल्टीपर्पज ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आॅफ मेडिटेशन सेंटरचे भूमिपूजन व पर्यटन महामंडळातर्फे बांधण्यात आलेल्या सभागृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, ड्रॅगन पॅलेसला भेट देण्यासाठी भारतीयच नव्हे तर विदेशातून लोक येत आहेत. हा परिसर जागतिक दर्जाचा व्हावा, यासाठी शासनातर्फे प्रयत्न करण्यात येत आहे. २१४ कोटी रुपयांचा एक आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला असून निधी प्राप्त झाल्यानंतर कामाला सुरुवात होईल. दीक्षाभूमीप्रमाणेच ड्रॅगन पॅलेसही जागतिक दर्जाचे करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी प्रास्ताविक व आभार मानले. (प्रतिनिधी)