शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

कोरोनामुळे अनुदान देयके स्वीकारण्याची तारीख वाढवा : हायकोर्टाचा कोषागारला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 23:54 IST

चालू आर्थिक वर्षातील अनुदानाशी निगडित देयके स्वीकारण्यासाठी सोयिस्कर अंतिम तारीख ठरविण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी लेखा व कोषागार विभागाचे संचालक आणि वित्त विभागाचे प्रधान सचिव (लेखा व कोषागार) यांना दिला.

ठळक मुद्दे२७ मार्च तारीख ठरविण्यावरून ओढले ताशेरे

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनावरील उपाययोजनांतर्गत सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. राज्य सरकारने कार्यालयांमध्ये ५ टक्क्यांवर कर्मचारी उपस्थित ठेवण्यास मनाई केली आहे. सर्वांचे लक्ष कोरोनाला नष्ट करण्यावर केंद्रित आहे. अशा परिस्थितीत चालू आर्थिक वर्षातील अनुदानाशी निगडित देयके स्वीकारण्यासाठी २७ मार्च ही अंतिम तारीख ठरवणे सर्वांसाठी गैरसोयीचे आहे. त्यामुळे वादग्रस्त निर्णयावर पुनर्विचार करून चालू आर्थिक वर्षातील अनुदानाशी निगडित देयके स्वीकारण्यासाठी सोयिस्कर अंतिम तारीख ठरविण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी लेखा व कोषागार विभागाचे संचालक आणि वित्त विभागाचे प्रधान सचिव (लेखा व कोषागार) यांना दिला.प्रकरणावर न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. उच्च न्यायालयात सी. एच. शर्मा व इतरांची सरकारी रुग्णालयांच्या सर्वांगीन विकासासंदर्भातील जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यात हा मुद्दा हाताळण्यात आला. वित्त विभागाचे प्रधान सचिव (लेखा व कोषागार) यांच्या आदेशानुसार लेखा व कोषागार विभागाचे संचालकांनी २४ मार्च रोजी संबंधित निर्णयाचे परिपत्रक जारी केले होते. जिल्हा कोषागार व उप-कोषागार आणि अधिदान व लेखा कार्यालय येथे चालू आर्थिक वर्षातील अनुदानाशी निगडित देयके २७ मार्चपर्यंतच स्वीकारण्यात यावेत असे निर्देश त्याद्वारे देण्यात आले होते. तसेच, या तारखेनंतर केवळ कोरोना आजाराशी निगडित देयके स्वीकारण्याची मुभा देण्यात आली होती. कोरोनामुळे कर्मचारी कमी करण्यात आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले होते.याचिकेतील न्यायालय मित्र अ‍ॅड. अनुप गिल्डा यांनी गुरुवारी या मुद्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधून २७ मार्च ही तारीख सर्वांसाठी गैरसोयीची असल्याचे सांगितले. त्यात तथ्य आढळून आल्यामुळे न्यायालयाने लेखा व कोषागार विभागाचे संचालक आणि वित्त विभागाचे प्रधान सचिव (लेखा व कोषागार) यांच्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले व वरील आदेश दिला.कोरोना नियंत्रणावर वाईट परिणाम करणारा निर्णयदेयके स्वीकारण्याची २७ मार्च ही अंतिम तारीख ठरविणारा निर्णय कोरोना नियंत्रणाच्या प्रयत्नांवर वाईट परिणाम करणारा आहे. तसेच, हा निर्णय एकतर्फी  व न्यायतत्वाचे उल्लंघन करणाराही आहे असे परखड मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. सर्व वैद्यकीय यंत्रणा व संबंधित प्राधिकरणे कोरोना नष्ट करण्यामध्ये गुंतली आहेत. अशा परिस्थितीत कोरोनावरील लक्ष हटवून देयके सादर करण्याचे काम करणे अशक्य आहे. तसेच, कोरोना नियंत्रण उपाययोजनांतर्गत सर्व शासकीय विभागांतील कर्मचारी संख्या कमी करण्यात आली आहे. परिणामी, २७ मार्चपर्यंत देयके सादर करणे शक्य होणार नाही. देयके स्वीकारण्यासाठी ३१ मार्चनंतरची तारीख निश्चित केली असती तर, सर्वांच्या सोयीचे झाले असते. देश सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रभावी उपायांची गरज आहे. त्यामुळे वित्त व कोषागार प्राधिकरणांनी परिस्थिती पाहून सोयिस्कर निर्णय घ्यायला पाहिजे होता असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्या