शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

वाफेच्या दाबाने होतो स्फोट

By admin | Updated: December 4, 2015 03:15 IST

बुधवारी एका लग्नसमारंभात कॉफी मशीनचा स्फोट झाल्याने १० वर्षीय मुलीसह चार जण जखमी झाले होते.

तज्ज्ञांचे मत : स्टीलची टँक टाळावीनागपूर : बुधवारी एका लग्नसमारंभात कॉफी मशीनचा स्फोट झाल्याने १० वर्षीय मुलीसह चार जण जखमी झाले होते. कॉफी मशीनचा इतका भीषण स्फोट कसा होऊ शकतो, याबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. यासंदर्भात मेकॅनिकल क्षेत्रातील काही तज्ज्ञांशी चर्चा केली असता, त्यांच्या मते कॉफी मशीन आणि कुकरचे तंत्रज्ञान सारखे आहे. कुकरमध्ये जसा वाफेचा दाब वाढतो, वाफ बाहेर निघण्यास अडथळा निर्माण होतो, तेव्हा कुकरचा स्फोट होतो. असाच काहीसा प्रकार कॉफी मशीनसंदर्भांत झाल्याने मशीनचा स्फोट झाल्याचे त्यांनी सांगितले. कॉफी मशीनमध्ये पाण्याची टँक असते. त्या टँकमध्ये २ हजार वॅटचे दोन कॉईल असतात. या कॉईलमुळे पाण्याचे तापमान वाढून त्याची वाफ होते. मशीनच्या एका भागाला नळी व दुसऱ्या भागाला सेफ्टी वॉल असतो. लग्नसमारंभात मशीन सतत सुरू राहते. टँकमध्ये वाफेचा दाब वाढतो. सेफ्टी वॉल खराब झाला असेल अथवा बंद करून ठेवला असेल तर वाफेला बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होतो. कुकरचा प्रेशर वॉल खराब झाल्यास जसा स्फोट होतो, तसाच स्फोट कॉफी मशीनमध्येसुद्धा होऊ शकतो. टँकच्या आत निर्माण झालेल्या वाफेच्या दाबाला टँक सहन करू शकत नाही. त्यामुळे मशीनमध्ये जोरदार स्फोट होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कॉफी मशीनची टँक कॉपरने बनविणे आवश्यक आहे. जेव्हा मशीनचे सर्व उपकरण काम करीत नसेल तेव्हाही कॉपर टँकचा स्फोट होत नाही, टँक केवळ लिकेज होते. मात्र स्टीलच्या टँकमध्ये प्रचंड स्फोट होतो. कॉपर महाग व स्टील स्वस्त असल्याने अशा घटना घडतात.(प्रतिनिधी) मशीनमध्ये प्रेशर रिलिफ वॉल लावणे गरजेचे कॉफी मशीनच्या टँकमध्ये नेहमी २ बाय ३ प्रमाणात पाणी असावे. हे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी पाण्याचे लेव्हल सेन्सर लावणे गरजेचे आहे. कॉफी मशीनमध्ये प्रेशर रिलिफ वॉल लावणे गरजेचे आहे. प्रेशर स्वीच काम करीत नसल्यास हा वॉल कुकरच्या वॉलसारखा काम करतो. मशीनमध्ये हा वॉल नसेल अथवा काम करीत नसेल तर टँकमध्ये वाफेचा दाब वाढल्याने टँक फुटू शकते. -तपन मिस्त्री, कॉफी मशीनचे तन्ज्ञ.