शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर ‘टेन के’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: October 24, 2015 03:15 IST

प्रो-हेल्थ फाऊंडेशनच्यावतीने आणि लोकमतच्या सहकार्याने रविवार २५ आॅक्टोबर रोजी आयोजित ‘नागपूर १० के’ दौडीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.

रविवारी दौड : तीन हजार धावपटूंचा सहभागनागपूर : प्रो-हेल्थ फाऊंडेशनच्यावतीने आणि लोकमतच्या सहकार्याने रविवार २५ आॅक्टोबर रोजी आयोजित ‘नागपूर १० के’ दौडीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. या स्पर्धेतील विजेत्यांवर १ लाख ६० हजारांच्या रोख रकमेसह विविध भेटवस्तूंच्या स्वरूपात बक्षिसांची लयलूट होणार आहे.संस्थेचे प्रमुख डॉ. अमित समर्थ यांनी सांगितले की, पहिले वर्ष असताना देखील इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला याचा आनंद वाटतो. याच कारणास्तव सहभागी होणाऱ्यांसाठी प्रवेश तिथी २४ आॅक्टोंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. दौडीत तीन हजार धावपटूंनी प्रवेश निश्चित केला असून त्यात तीन किमी दौडीत १५००, पाच किमी दौडीत एक हजार आणि दहा किमी दौडीत ५०० वर खेळाडू सहभागी झाले आहेत.आज शनिवार २४ आॅक्टोबर रोजी अमरावती मार्गावरील भास्कर भवन येथे धावपटूंना टी शर्ट वितरण करण्यात येईल. सोबतच प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंची नावे नोंदविण्यात येतील. दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज मैदानावरून दौडीला प्रारंभ होईल. दौडीची सांगता याच ठिकाणी होणार आहे. तीन, पाच आणि दहा किमी अंतराच्या दौडीतील विजेत्यांना एकूण १ लाख ६० हजाराचे रोख पुरस्कार दिले जातील. याशिवाय प्रत्येक गटातील पहिल्या पाच विजेत्यांना लोटो शूज देण्यात येणार आहेत. सर्व सहभागी धावपटूंना आयोजकांकडून टी शर्ट, बॅग आणि रिफ्रेशमेंट देण्यात येणार आहे. दौड पूर्ण करणाऱ्या सर्वांना मेडल्स तसेच प्रमाणपत्र दिले जाईल. दहा किमी दौडीत विजेत्या धावपटूला दहा हजार, दुसऱ्या स्थानावरील स्पर्धकास पाच हजार, तिसऱ्या स्थानासाठी तीन हजार, चौथ्या स्थानासाठी दोन हजार आणि पाचव्या स्थानासाठी एक हजाराचे बक्षीस राहील. दौडमध्ये सहभागी होण्यासाठी हॉलमार्क (लॉ कॉलेज चौक), एनसायक्लोपीडिया (त्रिमूर्ती नगर), वेव्ह (श्रीराम टॉवर्स), वर्धमान इलेक्ट्रॉनिक्स (वर्धमान नगर), लोटो शॉपी(मुंजे चौक), तसेच प्रो हेल्थ फाऊंडेशनच्या नासुप्र स्केटिंग रिंक डागा ले आऊट येथील कार्यालयात संपर्क करता येईल. (क्रीडा प्रतिनिधी)