शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता लांडग्याला युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
4
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
5
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
6
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
7
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
8
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
9
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
10
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
11
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
12
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
13
शाळेजवळ डान्सबार, बघे पोलिस, कारवाई मनसेवर
14
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
15
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
16
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
17
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
18
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
19
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
20
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा

ओबीसींच्या अस्वस्थतेवर उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:07 IST

वैद्यकीय व दंतचिकित्सा अभ्यासक्रमांमधील पदवी व पदव्युत्तर प्रवेशांमध्ये ओबीसींना २७ टक्के व आर्थिक दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षण यंदाच्याच ...

वैद्यकीय व दंतचिकित्सा अभ्यासक्रमांमधील पदवी व पदव्युत्तर प्रवेशांमध्ये ओबीसींना २७ टक्के व आर्थिक दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षण यंदाच्याच सत्रापासून लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या घोषणेचे देशभरातून स्वागतच होईल. देशभरातील हजारो विद्यार्थी आता या अभ्यासक्रमासाठी केंद्रीय कोट्यातून अर्ज करू शकतील. एमबीबीएस ही पदवी तसेच एमडी, एमएस या पदव्युत्तर पदव्या आणि विविध प्रकारच्या विशेष उपचाराच्या पदविका, त्याचप्रमाणे दंतरोगचिकित्सा विषयाची बीडीएस ही पदवी व एमडीएस ही पदव्युत्तर पदवी या अभ्यासक्रमांमध्ये हे नवे आरक्षण अंमलात येणार आहे. पदवी अभ्यासक्रमासाठी केंद्रीय कोटा पंधरा टक्के, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पन्नास टक्के आहे. कोरोना महामारीमुळे आरोग्य क्षेत्राचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. अधिकाधिक डॉक्टर्स, परिचारिका, तंत्रज्ञांची गरज निर्माण झाली आहे. अशावेळी या शिक्षण शाखेच्या बळकटीकरणाची गरज तर आहेच. शिवाय, विविध समाजघटकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात संधी मिळणेही आवश्यक आहे. मोदी सरकारच्या सात वर्षांच्या कार्यकाळात देशात नवी १७९ वैद्यक महाविद्यालये उघडली गेली. त्यामुळे देशातील मेडिकल कॉलेजची संख्या ५५८वर पोचली. एमबीबीएसच्या एकूण जागा तीस हजारांनी वाढून ८५ हजारांच्या घरात गेल्या व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या जागाही जवळपास पंचवीस हजारांनी वाढल्या. सध्या पदव्युत्तर वैद्यक अभ्यासक्रमात देशात ५४ हजार २७५ जागा आहेत. सरकारच्या या नव्या आरक्षणाचा लाभ, केंद्राच्या ओबीसी यादीतील समाजाचे जवळपास दीड हजार विद्यार्थी पदवीसाठी, तर अडीच हजार विद्यार्थी पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतील. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील साडेपाचशे विद्यार्थी पदवी, तर हजार विद्यार्थी पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतील. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदविका, पदवी किंवा पदव्युत्तर अशा कोणत्याच अभ्यासक्रमात केंद्रीय कोट्यामध्ये २००७पूर्वी आरक्षण नव्हते. केंद्र सरकारने अनुसूचित जाती व जमाती या वर्गासाठी अनुक्रमे पंधरा व साडेसात टक्के घटनात्मक आरक्षणाची अंमलबजावणी वैद्यक अभ्यासक्रमामध्ये त्या वर्षी सुरू केली. त्याच वर्षी एका नव्या कायद्याने मेडिकल वगळता अन्य अभ्यासक्रमांसाठी ओबीसींना २७ टक्के आरक्षण लागू झाले. गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी सरकारने घटनादुरूस्तीच्या मार्गाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी दहा टक्के आरक्षणासाठी तरतूद केली खरी. पण, ते आरक्षण वैद्यकीय प्रवेशांसाठी लागू झाले नव्हते. इतर शिक्षण शाखांमध्ये ते आरक्षण लागू करताना अंदाजे तेवढ्या जागा वाढविण्याची घोषणा सरकारने केली होती, जेणेकरून खुल्या प्रवर्गातील जागा या नव्या आरक्षणामुळे कमी होणार नाहीत. आता ओबीसींसोबत त्या घटकांनाही सर्व प्रकारच्या वैद्यक प्रवेशांसाठी केंद्रीय कोट्यात हे आरक्षण लागू करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या या घोषणेला महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाच्या तिढ्याची पृष्ठभूमी आहे. विशेषत: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून अनुसूचित जाती, जमाती व ओबीसी आरक्षणाचे जे सूत्र समोर आले त्या अनुषंगाने देशभर ओबीसी समाजघटक नाही म्हटले तरी अस्वस्थ आहेत. नवी घोषणा त्या जखमेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न म्हणता येईल. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारचे घटकपक्ष व विरोधी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी या मुद्द्यावर एकमेकांविरूद्ध शड्डू ठाेकले आहेत. सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकविण्यासाठी आवश्यक असलेला इम्पिरिकल डाटा देण्यास केंद्र सरकारने असमर्थता दाखविल्यापासून भाजप नेत्यांची राज्यात कोंडी झाली होती. अशावेळी वैद्यक प्रवेशांमध्ये ओबीसी आरक्षण लागू करण्यात आल्यामुळे भाजपच्या नेत्यांनाही हायसे वाटले असेल. ओबीसी समाजाचे अभ्यासक, तसेच राजकीय नेते आरोप करतात तसे केंद्रातील भाजपचे सरकार अथवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही मातृसंस्था आरक्षणाच्या विरोधात नाही, हे दाखविण्यासाठी ही नवी घोषणा कामात येईल. तथापि, केंद्राच्या या घोषणेने ओबीसी आरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्यांचे पूर्ण समाधान झाले आहे असे अजिबात नाही. वैद्यक अभ्यासक्रमातील आरक्षणाच्या घोषणेनंतर उमटलेल्या प्रतिक्रिया पाहता ओबीसी जनगणना, म्हणजेच देशभर जातीनिहाय गणना ही या मंडळींची मागणी कायम आहे. त्यासाठी केंद्र सरकारवर दबाव वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणखी एक प्रतिक्रिया उमटली आहे व तिचीदेखील दखल केंद्रातील सत्ताधाऱ्यांना घ्यावी लागेल. अनुसूचित जाती, जमातीचे आधीचे साडेबावीस टक्के व आता ओबीसी व आर्थिक दुर्बल मिळून सदतीस टक्के असे आता एकूण आरक्षण साडेएकोणसाठ टक्के झाले. मग, कोणत्याही आरक्षणाच्या पन्नास टक्के मर्यादेचे काय, हा प्रश्न पुढच्या काळात चर्चेत राहील.

------------------------------------------