शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जुलैपासून शेतकऱ्यांना मिळणार हवामानाचा अचूक अंदाज

By admin | Updated: June 9, 2017 17:45 IST

पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

मिलिंद कीर्तीचंद्रपूर : पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांना येत्या जुलै महिन्यापासून हवामानाच्या अचूक वेळेचा अंदाज मोफत मिळणार आहे. राज्यात मुंबई वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये २ हजार ६५ स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येत आहेत. या केंद्रांचा लाभ राज्यातील ५० लाख शेतकऱ्यांना होणार आहे.विदर्भामध्ये कोरडवाहू शेती आहे. ती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. तसेच पश्मिच महाराष्ट्रातील काही जिल्हे कायमचे दुष्काळी असतात. या दोन्ही भागातील शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज कसा राहील, याची माहिती अत्यंत आवश्यक आहे. पावसात खंड पडला की, दुबार, तिबार पेरणी करावी लागते. तसेच अवकाळी पावसामुळेही शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होते. हे केवळ हवामानाच्या अचूक माहितीअभावी घडत असते. त्याकरिता राज्याच्या कृषी खात्याने ‘महावेध हवामानाचा, समृद्ध शेतीचा’ असे अभियान हाती घेतले आहे.शेतकऱ्यांना हवामानाची माहिती देण्याकरिता प्रत्येक महसूल मंडळामध्ये एक स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्यात येत आहे. त्याकरिता महसूल खात्याने जागा उपलब्ध करून दिली आहे. त्याचे काम सुरू झाले आहे. हे काम जूनअखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. पुणे येथे स्कॉयमेट व्हेदर ही संस्था प्रत्येक स्वयंचलित हवामान केंद्राची माहिती संकलित करणार आहे. त्यानंतर ती जिल्ह्यातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येईल. ती माहिती शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे मोबाईलवर पाठविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना तहसील कार्यालय व तालुका कृषी कार्यालयातही हवामानाचा अंदाज उपलब्ध राहणार आहे.प्रत्येक १० मिनिटांनी अंदाजसध्या किसान एसएमएस सेवा सुरू आहे. त्या सेवेशी राज्यातील ५० लाख शेतकरी जोडण्यात आलेले आहेत. या ५० लाख शेतकऱ्यांना स्वयंचलित हवामान केंद्रात संकलित होणारा हवामानाचा अंदाज प्रत्येक १० मिनिटांनी एसएमएसद्वारे उपलब्ध केला जाणार आहे. १२ किलोमीटरच्या परिसरातील शेतकऱ्यांना एका केंद्रातून हवामानाचा अचूक अंदाज प्राप्त होणार आहे.सौर उर्जेवर चालणार केंद्रस्वयंचलित हवामान केंद्र बंद पडणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. हे केंद्र सौर उर्जेवर आधारित आहे. त्यामुळे केंद्राची देखभाल करण्यासाठी फारसा वेळ द्यावा लागणार नाही. केंद्राद्वारे शेतकऱ्यांना तापमान, पर्जन्यमान, सापेक्षा आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा आदी माहिती एसएमएसने देण्यात येईल.