शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

माजी सैनिकाने केला गोळीबार

By admin | Updated: March 15, 2017 02:33 IST

होळीची राख साफ करण्यावरून झालेल्या वादात एकाने हवेत गोळीबार केला.

धुळवडीच्या दिवशी वाद : मानकापुरात तणाव नागपूर : होळीची राख साफ करण्यावरून झालेल्या वादात एकाने हवेत गोळीबार केला. सोमवारी रात्री ६.४५ वाजता ही घटना घडली. यामुळे मानकापुरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. श्रीनिवास कामेश्वर सिंग (वय ४६) हा मानकापूरच्या विठ्ठल-रुक्मिणी नगरात राहतो. तो माजी सैनिक आहे. नागपुरात श्री सिक्युरिटी एजन्सी नावाने तो सुरक्षा एजन्सीही चालवितो. त्याच्या शेजारी राहणाऱ्यांनी बाजूच्या राजाराणी मंगल कार्यालयासमोर रविवारी रात्री होळी पेटविली. पूजा-अर्चना झाल्यानंतर सोमवारी सकाळपासून या ठिकाणी शेजारी रंग खेळले. सायंकाळी सिंग याच्या शेजारी राहणारे ओंकार गंगाधर तिवसकर यांनी होळीची राख साफ करण्यासाठी पाईपने पाणी मारले. त्यामुळे राखडीसह पाण्याचा लोट सिंग यांच्या अंगणात (दारासमोर) साचला. यावरून आरोपी चिडला. त्याने शेजाऱ्यासोबत वाद घालून घाणेरड्या शिव्या आणि धमकी देऊ लागला. त्यामुळे ओंकार गंगाधर तिवसकर आणि इतर शेजारी गोळा झाले. बाचाबाचीनंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली. त्यानंतर आरोपी सिंग त्याच्या घराच्या बाल्कनीत आला आणि १२ बोअरची बंदूक काढून त्याने गोळीबार केला. सुदैवाने कुणाला दुखापत झाली नाही. मात्र, गोळीबारामुळे परिसरात प्रचंड दहशत आणि तणाव निर्माण झाला. अल्पावधीतच राजाराणी मंगल कार्यालयासमोर मोठी गर्दी जमली. माहिती कळताच मानकापूरचे ठाणेदार भटकर, उपनिरीक्षक मिथिलेश त्रिपाठी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धावले. त्यांनी दोन्ही गटातील मंडळींना पोलीस ठाण्यात आणले. तोपर्यंत वरिष्ठ अधिकारीही पोलीस ठाण्यात पोहचले.(प्रतिनिधी)