शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येकाने समाजऋण फेडण्याचा प्रयत्न करावा

By admin | Updated: December 28, 2014 00:40 IST

संत नामदेवांनी कुत्र्याने चपाती नेल्यामुळे त्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन गेले. संत एकनाथांनी गाढवाला तहान लागल्यामुळे आपल्या कावडीतील पाणी दिले. प्रत्येक प्राण्यात ईश्वराने दिलेला

सुधीर मुनगंटीवार : बहार बाविस्करांना लक्ष्मीकांत हरकरे स्मृती पुरस्कार प्रदाननागपूर : संत नामदेवांनी कुत्र्याने चपाती नेल्यामुळे त्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन गेले. संत एकनाथांनी गाढवाला तहान लागल्यामुळे आपल्या कावडीतील पाणी दिले. प्रत्येक प्राण्यात ईश्वराने दिलेला जीव वास करतो. त्यामुळे प्रत्येकाने प्राण्यांसाठी काहीतरी करून समाजऋण फेडण्याची गरज आहे, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.वनराई फाऊंडेशनच्यावतीने स्व. लक्ष्मीकांत हरकरे स्मृती वन्यजीव संवर्धन पुरस्कार २०१४ ‘वाईल्ड सीईआर’ संस्थेचे संस्थापक डॉ. बहार बाविस्कर यांना शंकरनगर चौकातील राष्ट्रभाषा संकुल सभागृहात प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर वनराईचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, ज्येष्ठ पत्रकार विश्वास पाठक, डॉ. पिनाक दंदे, सत्कारमूर्ती डॉ. बहार बाविस्कर, नितीन जतकर, अनिल राठी यांची प्रमुख उपस्थिती होती. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, समाजात चांगुलपणाची भावना निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रत्येक प्राण्याला योग्य आहार घेण्याचा आणि जिवंत राहण्याचा अधिकार आहे. वनराईतर्फे समाजाला दिशा देण्याचे काम होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. डॉ. गिरीश गांधी यांनी वन्य जीवांच्या संरक्षणासाठी लक्ष्मीकांत ऊर्फ राजू हरकरे यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली. पुरस्काराचा हा पाचवा कार्यक्रम असून वन्य प्राण्यांसाठी भरीव कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे सांगितले. ज्येष्ठ पत्रकार विश्वास पाठक यांनी समाजात चांगल्या कामाची ओळख करून देणाऱ्या संस्था उरल्या नसल्याची खंत व्यक्त केली. आपले मनोगत व्यक्त करताना सत्कारमूर्ती डॉ. बहार बाविस्कर यांनी आपल्या वाटचालीचा आलेख उपस्थितांसमोर मांडला. लक्ष्मीकांत ऊर्फ राजू हरकरेंसोबत केलेल्या कामाची माहिती त्यांनी देऊन जखमी वन्य प्राण्यांवर उपचार करण्याविषयी समाजात, वनविभागात उदासीनता असल्याचे मत व्यक्त केले. संचालन नितीन जतकर यांनी केले. आभार स्वानंद सोनी यांनी मानले. (प्रतिनिधी)