शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दरवर्षी ६० लाख नवे हृदयरोगी

By admin | Updated: September 28, 2015 03:20 IST

देशात हृदयरोगाचे दोन कोटींच्यावर रुग्ण आहेत. यात दरवर्षी ६० लाख नव्या हृदयरोग रुग्णांची भर पडत आहे.

१०० टक्के ब्लॉकेजमध्येही होते एन्जिओप्लास्टी : सीएसआयचा पदग्रहण सोहळा नागपूर : देशात हृदयरोगाचे दोन कोटींच्यावर रुग्ण आहेत. यात दरवर्षी ६० लाख नव्या हृदयरोग रुग्णांची भर पडत आहे. धक्कादायक म्हणजे अनेकांना आपण हृदयरोगाचे रुग्ण आहोत हे हार्टअटॅक आल्यानंतरच कळते. यामुळे या आजाराविषयी व्यापक जनजागृती होऊन योग्य उपचार उपलब्ध करून होणे आवश्यक आहे, अशी माहिती कार्डियालॉजीकल सोसायटी आॅफ इंडिया, (सीएसआय) विदर्भ शाखेचे नवनिर्वाचित अध्यक्ष व हृदयरोग विशेषज्ञ डॉ. नितीन तिवारी यांनी येथे दिली. कार्डिओलॉजिकल सोसायटी आॅफ इंडिया विदर्भ शाखेच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवारी सकाळी रामदासपेठ येथील खासगी हॉटेलमध्ये थाटात पार पडला. यावेळी ते बोलत होते. सीएसआयचे नवनियुक्त सचिव डॉ. अमोल मेश्राम उपस्थित होते. कार्यक्रमानंतर २४ वे डॉ. के.जी. देशपांडे स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मुख्य वक्ते म्हणून हृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रकाशवीर पारीख व डॉ. मोहम्मद रेहान सईद उपस्थित होते. डॉ. तिवारी म्हणाले, हृदय हा स्नायू संपूर्ण शरीरातल्या सर्व पेशींना प्राणवायू व पौष्टिके रक्तामार्फत पोचविण्याचे काम करणारा पंप आहे. पेसमेकरची गरज भासणारी सर्वात जास्त प्रमाणात आढळणारी हृदयाची व्याधी म्हणजे ‘ब्रॅडिकार्डिआ’ यात शरीराच्या गरजा पुरविण्यासाठी आवश्यक त्या गतीने हृदयाचे ठोके पडत नाहीत किंवा त्यात अनियमितता येते. साधारण पम्पींग ३५ टक्के कमी होते. हृदयाची लय धिमी झाल्याच्या सर्वाधिक समस्यांवर आजमितीस उपलब्ध असलेली एकमेव उपचार पद्धती म्हणजे पेसमेकरचे प्रत्यारोपण होय. पेसमेकर अचूकपणे कालबद्ध केलेली विद्युतकंपने निर्माण करून त्यास उत्तेजना देतो. ही विद्युतकंपने तुमच्या हृदयाची आकुंचन/प्रसारणे सामान्य हृदयलयीच्या जवळपास आणतात व अशा प्रकारे बॅड्रिकार्डिआचे दुष्परिणाम कमी केले वा टाळले जातात, असेही ते म्हणाले. डॉ. प्रकाशवीर पारीख म्हणाले, १०० टक्के ब्लॉकेजमध्येही अ‍ॅन्जिओप्लास्टी होते. जपानमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. आपल्याकडे काहीच डॉक्टर हे करतात. ‘छोट्या चिरेच्या हृदय शल्यक्रिया तंत्रात झालेले परिवर्तन’ या विषयावर बोलताना डॉ. मोहम्मद रेहान सईद म्हणाले, अद्यावत तंत्रज्ञान, कौशल्य व औषधांमुळे ‘ओपन हार्ट सर्जरी’चे प्रमाण कमी होत आहे. यावेळी त्यांनी सर्जरीतील कौशल्यावर विशेष भर देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.(प्रतिनिधी)