शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

कधी स्वीकारले, कधी नाकारले

By admin | Updated: September 5, 2014 01:10 IST

१९६२ पासूनच्या विधानसभा निवडणूक निकालावर नजर टाकली तर पारंपरिक राजकीय पक्षातील दिग्गजांना धक्के देत मतदारांनी अपक्षांना संधी दिली. त्याचप्रमाणे चक्क पाच निवडणुकांमध्ये त्यांना

विधानसभेत अपक्षांनी दिले : प्रस्थापितांना धक्केनागपूर : १९६२ पासूनच्या विधानसभा निवडणूक निकालावर नजर टाकली तर पारंपरिक राजकीय पक्षातील दिग्गजांना धक्के देत मतदारांनी अपक्षांना संधी दिली. त्याचप्रमाणे चक्क पाच निवडणुकांमध्ये त्यांना नाकारलेसुद्धा. त्यामुळे आगामी निवडणुकीत अपक्षांचे काय होईल याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.१९६२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नागपूर शहरातील तीनपैकी दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. नागपूर-१ मधून विनायक सखाराम दांडेकर या अपक्ष उमेदवाराने काँग्रेसचे मदनगोपाल अग्रवाल यांचा पराभव केला होता. तर नागपूर-२ या मतदारसंघातून धोंडबाजी हेडाऊ यांनी काँग्रेसचे प्रतापसिंह लक्ष्मणराव भोसले यांचा पराभव केला होता. नागपूर-३ मधून रिपाइंचे डी.पी. मेश्राम विजयी झाले होते. बाकी सर्व जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते.१९६७ मध्ये काटेलमध्ये अपक्ष उमेदवाराने बाजी मारली होती. जे.एस. चांडक यांनी काँग्रेसचे नेते एस.डी. गेडाम यांना पराभूत करून विजयश्री प्राप्त केली होती. जिल्ह्यातील दहापैकी ९ जागा काँग्रेसने जिंकल्या.१९७२ ते १९९० या दरम्यान विधानसभेच्या एकूण पाच निवडणुका झाल्या. पण जिल्ह्यातील एकाही मतदारसंघात अपक्षांना बाजी मारता आली नाही.१९९५ ची निवडणूक अपक्षांसाठी सुवर्णकाळ ठरली. जिल्ह्यातून पाच उमेदवार विजयी झाले. त्यानंतर १९९९ मध्ये उमरेडमधून वसंत इटकेलवार यांना संधी मिळाली तर २००४ च्या निवडणुकीत सुनील केदार अपक्ष म्हणून लढले आणि विजयी झाले. २००९ च्या निवडणुकीतही अपक्षांच्या पदरी पराभवच आला. आता २०१४ ची निवडणूक आहे. त्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेने केंद्रात भाजप आघाडीला संपूर्ण बहुमत दिले. त्यामुळे अपक्षांचे महत्त्व कमी झाले आहे. विधानसभेच्या निवडणुकीतही युती आणि आघाडी संपूर्ण बहुमतासाठीच प्रयत्न करणार असली तरी दोन्ही बाजूने काही अपक्षही पेरले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर जनता यंदा अपक्षांना किती महत्त्व देते हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)