शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

म्हातारपणातही काबाडकष्टच

By admin | Updated: December 19, 2014 00:49 IST

डोक्यावर छप्पर नसल्यामुळे रेल्वेच्या जमिनीत झोपडी उभारली. मूलबाळ नसल्यामुळे आणि पतीकडूनही काम होत नसल्यामुळे तुमसर जिल्हा भंडारा येथील सरस्वती सूर्यवंशी या ७० वर्षांच्या वृद्ध महिलेला

शरीर थकले : शासनाने मदतीचा हात देण्याची अपेक्षादयानंद पाईकराव - नागपूरडोक्यावर छप्पर नसल्यामुळे रेल्वेच्या जमिनीत झोपडी उभारली. मूलबाळ नसल्यामुळे आणि पतीकडूनही काम होत नसल्यामुळे तुमसर जिल्हा भंडारा येथील सरस्वती सूर्यवंशी या ७० वर्षांच्या वृद्ध महिलेला म्हातारपणातही मजुरी करण्याची पाळी आली आहे. त्यांच्याप्रमाणेच निलज ता. पवनी जिल्हा भंडारा येथील विठाबाई पाटील ही महिलाही ७० वर्षांच्या वयातही काबाडकष्ट करून उपजीविका भागवीत आहे. शासनाने म्हातारपणात तरी मदतीचा हात द्यावा, अशी माफक अपेक्षा त्यांनी मोर्चात सहभागी होऊन व्यक्त केली.सरस्वती सोमालाल सूर्यवंशी (७०) रा. तुमसर जिल्हा भंडारा या वयोवृद्ध महिलेवर म्हातारपणातही काबाडकष्ट करण्याची वेळ आली आहे. सरस्वतीचे पती सोमालाल ७५ वर्षांचे आहेत. त्यांच्याकडूनही या वयात कष्ट होत नाही. मूलबाळ नसल्यामुळे या दोघांचाही सांभाळ करणारे असे कुणीच नाही. रेल्वेच्या जागेत झोपडी उभारून त्यांनी डोक्यावर छप्पर केले. धुणीभांडी आणि मिळेल ते काम करून त्या आपला आणि पतीच्या पोटाची खळगी भरत आहेत. तीन वर्षांपासून श्रावणबाळ योजनेचे मानधन ५,४०० रुपये मिळावे यासाठी त्या विधानभवनाचा उंबरठा झिजवत आहेत. परंतु त्यांच्या मागण्यांवर काहीच निर्णय न झाल्यामुळे या शासनाला आमच्यासारख्या म्हाताऱ्यांची कीव येत नाही काय ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरस्वतीसारखीच व्यथा निलज ता. पवनी जिल्हा भंडारा येथून आलेल्या विठाबाई उरकुडा पाटील (६५) या वयोवृद्ध महिलेने व्यक्त केली.