शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

लोणार सरोवर संवर्धनासाठी प्राधिकरण स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:09 IST

नागपूर : रामसर पाणथळ स्थळाचा दर्जा मिळालेल्या आणि व्यापक वैज्ञानिक संशोधनाला वाव असलेल्या जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या संवर्धन व विकासाकरिता ...

नागपूर : रामसर पाणथळ स्थळाचा दर्जा मिळालेल्या आणि व्यापक वैज्ञानिक संशोधनाला वाव असलेल्या जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या संवर्धन व विकासाकरिता प्राधिकरण स्थापन करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिले.

अमरावती विभागीय आयुक्त हे या प्राधिकरणचे अध्यक्ष, तर बुलडाणा जिल्हाधिकारी सचिव राहतील. प्राधिकरणमध्ये इतर संबंधित सरकारी विभागाचे अधिकारी व दोन अशासकीय संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत. याशिवाय, प्राधिकरणमध्ये या प्रकरणातील न्यायालय मित्र ॲड.आनंद परचुरे, न्यायालय आयुक्त वरिष्ठ वकील ॲड.सी.एस. कप्तान व सरकारी वकील ॲड.दीपक ठाकरे यांचा समावेश करण्याची सूचना न्यायालयाने केली आहे. प्राधिकरण स्थापनेचा जीआर जारी करण्यासाठी राज्य सरकारला ११ ऑगस्टपर्यंत वेळ देण्यात आला आहे.

या संदर्भात अ‍ॅड.कीर्ती निपानकर (नागपूर), गोविंद खेकाळे व सुधाकर बुगदाने (दोन्ही बुलडाणा) यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. हे प्रकरण गेल्या १२ वर्षांपासून प्रलंबित आहे. दरम्यान, न्यायालयाने लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी वेळोवेळी विविध आदेश दिले. असे असले, तरी आणखी बरीची ठोस कामे करायची बाकी आहेत. राज्य सरकारने गेल्या फेब्रुवारीमध्ये लोणार सरोवर विकास आराखडा अंमलबजावणी समिती आणि लोणार सरोवर विकास आराखडा संनियंत्रण समिती स्थापन करून, त्याविषयी जीआर जारी केले, परंतु न्यायालयाने त्यावर असमाधान व्यक्त केले. लोणार सरोवराकडे केवळ पर्यटनस्थळ म्हणून पाहण्यावर न्यायालयाने आक्षेप घेतला. ॲड.एस.एस. सन्याल यांनी मध्यस्थ म्हणून कामकाज पाहिले.