शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळेतही आता इंग्रजी भाषेतून शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 11:36 IST

५२ शासकीय आश्रमशाळांमध्ये पहिली इयत्तापासून इंग्रजी आणि सहावी इयत्तापासून सेमी इंग्रजी माध्यमात शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत.

ठळक मुद्देनागपूर अप्पर आयुक्त कार्यालयांतर्गत १३ शाळांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेता यावे यासाठी शासकीय आश्रमशाळांचे रूपांतर इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमात करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागातर्फे घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ५२ शासकीय आश्रमशाळांमध्ये पहिली इयत्तापासून इंग्रजी आणि सहावी इयत्तापासून सेमी इंग्रजी माध्यमात शिक्षणाचे धडे दिले जाणार आहे.महाराष्ट्रातील दुर्गम भागात आदिवासींच्या प्रगतीसाठी आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत ५०२ शासकीय आश्रमशाळा सुरु आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमानुसार या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून शिक्षण देण्यात येते. इंग्रजी माध्यमात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना खासगी नामांकित शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. या शाळेत विद्यार्थ्यांना पहिली ते बारावी शिक्षण मोफत देण्यात येते. या योजनेंतर्गत १७९ शाळांमध्ये ५४ हजार विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत आहेत.गेल्या काही वर्षात आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी आदिवासी पालकांचा कल वाढला आहे. यासाठी विभागामार्फत सुरु असलेल्या शासकीय आश्रमशाळेतच आदिवासी विद्यार्थ्यांची इंग्रजी माध्यमातील शिक्षणाची सोय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन आयएसओ मानांकन मिळालेल्या शासकीय आश्रमशाळांचे रूपांतर इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमात करण्यात येणार आहे. शाळा इमारत, वसतिगृह, वीज, दळणवळण, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, क्रीडांगण अशा सुविधा असलेल्या आश्रमशाळा इंग्रजी माध्यमासाठी निवडण्यात येणार आहेत. नागपूर अप्पर आयुक्त कार्यालयांतर्गत १३ आश्रमशाळेत इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमातील शिक्षण सुरु करण्यात येणार आहे.या शाळेत सीबीएससी माध्यमातून शिक्षण घेतलेले पदवीधारक उमेदवार यांची प्राथमिक शिक्षक म्हणून गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या नामवंत शिक्षण संस्थांबरोबर सामंजस्य करार करून गुणवत्ता धारक शिक्षक आणि शिक्षणतज्ञ यांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे.नागपूर अप्पर आयुक्त कार्यालयांतर्गत येणाऱ्या आश्रमशाळाआदिवासी अप्पर आयुक्त कार्यालय नागपूर अंतर्गत १३ आश्रम शाळांचा समावेश करण्यात आला आहे. यात नागपूर जिल्ह्यात १, चंद्रपूर जिल्ह्यात ३, गडचिरोली ४, गोंदिया ५ आश्रमशाळांचा समावेश आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र