शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजीच्या पुस्तकात ‘मिस्टेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:40 IST

मातृभाषेप्रमाणेच आजच्या तारखेत इंग्रजी भाषेचे ज्ञान असणेदेखील आवश्यक झाले आहे.

ठळक मुद्देराज्य मंडळाच्या ७ वी व ९ वीच्या पुस्तकात व्याकरण भरकटले :कसा होणार विद्यार्थ्यांच्या भाषेचा विकास?

योगेश पांडे। लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मातृभाषेप्रमाणेच आजच्या तारखेत इंग्रजी भाषेचे ज्ञान असणेदेखील आवश्यक झाले आहे. शालेय अभ्यासक्रमातून इंग्रजीचा पाया पक्का होत असतो. मात्र जर शाळेत शिकविल्या जाणाºया पुस्तकांमध्येच भरकटलेले व चुकीचे व्याकरण असेल तर...! वाचून आश्चर्य वाटले असेल, मात्र राज्य शिक्षण मंडळाच्या ७ वी व ९ वीच्या इंग्रजीच्या नवीन पुस्तकांमध्ये व्याकरणाच्या अनेक चुका आढळून आल्या आहेत. अशाप्रकारे चुकीचे व्याकरण विद्यार्थ्यांना शिकविल्या गेले तर उद्या जाऊन त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून यंदा इयत्ता ७ वी व ९ वीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला. नवीन पुस्तकांसाठी तज्ज्ञांची समितीदेखील नेमण्यात आली.३ मार्च २०१७ रोजी समन्वय समितीने नवीन पुस्तकांना मान्यता दिली.यानुसार इयत्ता ७ वीचे ‘माय इंग्लिश बुक सेव्हन’ आणि इयत्ता नववीचे ‘माय इंग्लिश कोर्सबुक’ छापण्यात आले. मात्र प्रत्यक्षात पुस्तके हाती आल्यानंतर इंग्रजीच्या अनेक शिक्षकांनी आश्चर्य व्यक्त केले. दोन्ही पुस्तकांत अनेक ठिकाणी व्याकरणाच्या चुका स्पष्टपणे दिसून येत आहेत. तर मराठीतूनच जसेच्या तसे इंग्रजीत भाषांतर झाले आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.वर्तमानकाळ आणि भूतकाळाची सरमिसळदोन्ही पुस्तकांमध्ये काही ठिकाणी धडा भूतकाळात सुरू होतो आणि अचानकपणे वर्तमानकाळातील व्याकरण वापरण्यात आले आहे. सातवीच्या पुस्तकातील ‘जर्नी टू द वेस्ट’ या धड्यात युवान च्वांगच्या प्रवासाबाबत भूतकाळात माहिती देण्यात आली आहे. मात्र पान क्रमांक १९ वरील ‘पॅरिग्राफ’मध्ये चक्क वर्तमानकाळ वापरण्यात आला आहे. नववीच्या पुस्तकातदेखील काही ठिकाणी अशा चुका आढळून आलेल्या आहेत.समितीचे दुर्लक्ष कसे झाले?या दोन्ही पुस्तकांसंदर्भात नागपूर जिल्ह्याच्या शैक्षणिक समन्वय समितीच्या सदस्य डॉ. प्रीती पेंढारकर यांनी तर चुकांची यादीच काढली आहे. साधारणत: दहावीपर्यंत विद्यार्थ्यांचा इंग्रजी व्याकरणाचा पाया मजबूत होत असतो. ही दोन्ही पुस्तके मराठी व ‘लोअर इंग्लिश’ असलेल्या विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाची आहेत. मात्र तज्ज्ञ समितीचा असूनदेखील लहान लहान चुका या दोन्ही पुस्तकांमध्ये दिसून येत आहेत. इंग्रजी भाषेमध्ये व्याकरणाला महत्त्व आहे. चुकीचे शब्द, अयोग्य व्याकरण यामुळे विद्यार्थ्यांवर चुकीचे संस्कार होतील व भविष्यात त्या आधारावरच ते पुढील शिक्षण घेतील. ही बाब गंभीर असून या बाबी लक्षात का घेण्यात आल्या नाहीत, असा प्रश्न डॉ. पेंढारकर यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या संचालकांशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही.