शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

संप ही आंदोलनाची सुरुवात

By admin | Updated: June 2, 2017 02:32 IST

शेतकरीही संपावर जाऊ शकतात, ही संकल्पनाच वेगळी आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला महराष्ट्रातील ४२ संघटनांचा पाठिंबा आहे.

सरकारने वेळीच दखल घ्यावी : शेतकरी संघटनांतील कार्यकर्त्यांचा सरकारला इशारा लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकरीही संपावर जाऊ शकतात, ही संकल्पनाच वेगळी आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला महराष्ट्रातील ४२ संघटनांचा पाठिंबा आहे. या आंदोलनाने पहिल्याच दिवशी सरकारला घाम फोडला आहे. ही केवळ सुरुवात आहे. सरकारने वेळीच याची दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र होऊ शकते, असा इशारा शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी सरकारला दिला आहे. कळमन्यातील सर्व बाजारपेठांमध्ये नियमित आवकमहाराष्ट्रात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा नागपुरात बाजारपेठांमध्ये काहीही परिणाम दिसून आला नाही. आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ कळमना बाजाराचा फेरफटका मारला असता सर्व बाजारपेठांमध्ये शेतकी मालाची आवक नियमितपणे सुरू होती. कळमना धान्य बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव कमलाकर घाटोळे यांनी सांगितले की, उन्हाळ्यात शेतकऱ्यांकडून सर्व धान्याची आवक कमीच आहे. काही शेतकऱ्यांनी नियमितपणे धान्य बाजारात आणले. नागपूर चिली मर्चंट असोसिएशनचे सचिव संजय वाधवानी म्हणाले, कळमना बाजारात मिरचीचा व्यवहार केवळ सोमवारी होतो. त्यामुळे आंदोलनाचा बाजारात काहीही परिणाम झाला नाही. भाजी बाजाराचे अध्यक्ष नंदकिशोर गौर यांनी सांगितले की, स्थानिक शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणेच भाजीपाला बाजारात विक्रीकरिता आणला. याशिवाय कळमन्यात कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली, जयपूर येथून भाजीपाला आला. आंदोलन केवळ पश्चिम नागपुरात सुरू आहे. त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याकडे ५० ते १०० एकर जमिनी आहेत. त्यातील बहुतांश शेतकरी आणि नेतेसुद्धा आहेत. ते शेतकी मालाला थेट बाजारात विक्रीसाठी नेतात. त्यांचा आंदोलनात सहभाग असल्यामुळे त्यांनी बाजार समितीत भाजीपाला नेला नाही. त्याची झळ त्या भागातील ग्राहकांना बसली. पण नागपुरात आंदोलनाची झळ पोहोचली नाही. कळमना बाजाराचा उपबाजार कॉटन मार्केट भाजीपाला बाजारात शेतकऱ्यांनी भाज्या नेहमीप्रमाणे विक्रीसाठी आणल्या. आंदोलनाचा काहीही परिणाम झालेला नाही, असे फळ आणि भाजीपाला अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी सांगितले. फळे बाजारात नेहमीप्रमाणे फळांची आवक सुरू होती. शेतकरी आंदोलनाचा परिणाम बाजारात दिसला नाही, असे फळे बाजार अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष आनंद डोंगरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.