शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

मोमीनपुरा मार्गावरील अतिक्रमण हटविले

By admin | Updated: July 12, 2016 03:07 IST

मोमीनपुरा भागातील मुख्य रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आल्याने, या मार्गावरील रहदारीला

नागपूर : मोमीनपुरा भागातील मुख्य रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आल्याने, या मार्गावरील रहदारीला अडथळा निर्माण झाला होता. यासंदर्भात नागरिक व व्यापाऱ्यांच्या तक्रारी होत्या. परंतु अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जात नव्हती. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने अखेर सोमवारी प्रचंड पोलीस बंदोबस्तात येथील ५५ अतिक्रमण हटविले.भगवाघर चौक ते बोरियापुरा दरम्यानच्या मार्गावर दुकानदारांनी अस्थायी शेड उभारले होते. त्यामुळे हा मार्ग अरुंद झाला होता. पथकाने सहायक आयुक्त अशोक पाटील, तहसील पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर व प्रवर्तन विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. भगवाघर चौकापासून अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर गुप्ता हॉटेल ते मोमीनपुरा गेट येथील अतिक्रमण हटविण्यात आले. बाजूच्या डेकोरेशन व्यावसायिकाला शेड काढण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर मोहम्मद अली सराय समोरील एमएलए कॅन्टीनसमोरील शेड काढण्यात आले. जेसीबीच्या साह्याने सिमेंटचे ओटे तोडण्यात आले. तसेच हाफीज बेकरी, बब्बू हॉटेल, हैदराबाद चिकन सेंटर येथील २० शेड हटविण्यात आले. सायंकाळपर्यत ५५ अतिक्रमण हटविण्यात आले होते.(प्रतिनिधी)भंगार व्यावसायिकांना तंबीरेल्वे स्टेशन ते मोतीबाग पुलादरम्यानच्या मार्गावर भंगार विक्रेत्यांनी अतिक्रमण केलेले आहे. भंगारातील वाहने रस्त्याच्या कडेला उभी ठेवल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होतो. या भंगार विक्रे त्यांना अतिक्रमण हटविण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. अतिक्रमण न हटविल्यास भंगार जप्त करण्याची तंबी देण्यात आली आहे.