शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आमदार टेकचंद सावरकर यांच्याविरुद्धची निवडणूक याचिका फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:10 IST

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कामठीचे आमदार टेकचंद सावरकर यांच्याविरुद्धची निवडणूक याचिका गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावली. न्यायमूर्ती ...

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कामठीचे आमदार टेकचंद सावरकर यांच्याविरुद्धची निवडणूक याचिका गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावली. न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्णय दिला.

ही याचिका मतदार सादुकर हटवार यांनी दाखल केली होती. सावरकर यांनी २०१९ मधील विधानसभा निवडणूक लढण्याकरिता नामनिर्देशनपत्रासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये वारसदार, त्यांची मालमत्ता, स्वत:ची मालमत्ता, बँक खाती, गहाण मालमत्ता व विविध प्रकारच्या कर्जांची माहिती लपवून ठेवली. असे असताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचे नामनिर्देशनपत्र अवैधपणे स्वीकारले. सावरकर यांनी संबंधित माहिती लपवून ठेवल्यामुळे त्याचा परिणाम निवडणुकीवर झाला. परिणामी, ते ११ हजार ११६ मतांनी विजयी झाले. करिता, त्यांची निवडणूक अवैध ठरवून रद्द करण्यात यावी व कामठी मतदारसंघात नव्याने निवडणूक घेण्यात यावी, असे हटवार यांचे म्हणणे होते. परंतु, त्यांचे मुद्दे न्यायालयाचे समाधान करू शकले नाही. हटवार यांच्यातर्फे ॲड. आर. एम. भांगडे, तर सावरकर यांच्यातर्फे ॲड. हरीश डांगरे यांनी कामकाज पाहिले.

--------------------

मुद्दे मोघम, निराधार, अस्पष्ट

हटवार यांनी याचिकेमध्ये कोणतेही ठोस मुद्दे मांडले नाही. याचिकेतील सर्व मुद्दे मोघम, निराधार व अस्पष्ट स्वरूपाचे आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधित्व कायद्यातील तरतुदींची पूर्तता होत नाही. याशिवाय, हटवार यांनी याचिकेत दिलेली माहिती कुठून मिळविली, माहितीचा स्त्रोत काय आहे हे सांगितले नाही. याचिकेची दखल घ्यावी असे कोणतेच कारण रेकॉर्डवर उपलब्ध नाही, असे उच्च न्यायालयाने याचिका फेटाळताना स्पष्ट केले.