शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आठ महिन्यांत ५७ अल्पवयीन मुली वासनेच्या शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:10 IST

नरेश डोंगरे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत ५७ मुली विकृतांच्या वासनेच्या शिकार ठरल्या. विशेष ...

नरेश डोंगरे ।

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत ५७ मुली विकृतांच्या वासनेच्या शिकार ठरल्या. विशेष म्हणजे, यातील ५६ गुन्ह्यांतील आरोपींच्या तक्रार दाखल होताच पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

आधी दिल्ली, नंतर हैदराबाद आणि आता साकीनाका मुंबईतील बलात्काराच्या घटनेमुळे पुन्हा एकदा बलात्कार आणि अपहरण (पळवून नेण्याच्या) गुन्ह्यांचा विषय सर्वत्र चर्चेला आला आहे. पोलिसांच्या उपाययोजनांचीही यासंबंधाने विश्लेषणवजा चर्चा केली जात आहे. न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, अल्पवयीन मुलींचे प्रेमप्रकरण अन् त्यातून तिच्याशी कुणी शरीरसंबंध जोडत असेल तर तो बलात्कारच ठरतो. त्यामुळे अल्पवयीन मुलीचे प्रकरण समोर आले आणि पालकांनी तक्रार नोंदवल्यास पोलीस बलात्काराचा गुन्हा दाखल करतात. नागपूर जिल्हा पोलीस यंत्रणा या संबंधाने कमालीची संवेदनशील आहे. तक्रार मिळताच तत्परतेने तपास करून गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्याचे आणि सबळ पुरावे गोळा करून आरोपीला शिक्षा होईल, असे दोषारोपपत्र दाखल करायचे, असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील प्रत्येक ठाणेदाराला दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांत गेल्या आठ महिन्यांत असे एकूण ५७ बलात्काराचे गुन्हे दाखल झालेत. त्यांच्या किंवा पालकांच्या तक्रारी मिळताच त्यातील ५६ प्रकरणांत पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपींना अटक केलेली आहे.

---

महिना बलात्कार अपहरण (पळवून नेणे)

जानेवारी २०२१ - ६ - १०

फेब्रुवारी - ८ - ५

मार्च - ६ - ७

एप्रिल - ५ - ६

मे - ८ - १४

जून - ११ - ८

जुलै - ४ - ८

ऑगस्ट - ९ - ११

----

गतवर्षीच्या तुलनेत घट

विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मुलीवरील बलात्काराच्या गुन्ह्यांत घट झाली आहे. गेल्या वर्षी बलात्काराचे ६१ गुन्हे दाखल झाले होते. या वर्षी (आठ महिन्यांत) ५७ गुन्हे दाखल झालेत.

---

गुन्ह्यांचा छडा लावण्याचे प्रमाण

पोलिसांनी या वर्षी बलात्काराच्या एकूण ५७ पैकी ५६ अर्थात ९८ टक्के गुन्ह्यांची उकल केली. तर, नेण्याच्या ६९ पैकी ५४ अर्थात ७८ टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात ग्रामीण पोलिसांनी यश मिळवले आहे.

----