शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

हार्ट अटॅक टाळण्यासाठी करा योग्य पद्धतीने भोजन

By admin | Updated: August 25, 2014 01:12 IST

आहार हाच मोठा ईश्वर आहे. त्यामुळे आपण जिवंत राहतो. आहारापुढे कुठलेच औषध नसून हार्ट अटॅक टाळण्यासाठी योग्य पद्धतीने खाण्याची प्रक्रिया शिकणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुंबईतील सुप्रसिद्ध

मनु कोठारी : हृदय मित्र मंडळाचा १४ वा वर्धापनदिन उत्साहातनागपूर : आहार हाच मोठा ईश्वर आहे. त्यामुळे आपण जिवंत राहतो. आहारापुढे कुठलेच औषध नसून हार्ट अटॅक टाळण्यासाठी योग्य पद्धतीने खाण्याची प्रक्रिया शिकणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुंबईतील सुप्रसिद्ध संशोधक डॉ. मनु कोठारी यांनी केले.हृदय मित्र मंडळाच्या १४ व्या वर्धापनदिनानिमित्त गोकुळपेठच्या राजाराम सीताराम दीक्षित वाचनालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून खगोलशास्त्राचे अभ्यासक, वैज्ञानिक डॉ. मधुकर आपटे उपस्थित होते. डॉ. मनु कोठारी म्हणाले, रुग्ण डॉक्टरकडे मोठ्या विश्वासाने जातात. वैद्यकीय आचारसंहितेत रुग्णाला मदत करणे डॉक्टरचे कर्र्तव्य आहे. परंतु बायपास सर्जरीबद्दल मेडिकल सायंसला काहीच नाही. आजकाल ९५ टक्के हृदयरुग्णांना बायपास, अँजिओग्राफी, अँजिओप्लॉस्टी करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. परंतु आजाराला घाबरू नका. ४० टक्के हार्ट अटॅक दुखण्याशिवाय येत नाहीत. अशा वेळी डॉक्टरांनी रुग्णांना योग्य दिशा देण्याची गरज आहे. वय झाल्यानंतर कॅन्सरचे मोठे कारण म्हणजे केमोथेरपी होय. लवकी ही हृदयरुग्णांसाठी अमृत आहे. हृदयरुग्णांना अँजिओप्लास्टी, बायपासने कुठलीच मदत होत नाही. जगात कुठेही बायपास, अँजिओग्र्राफी, अँजिओप्लॉस्टी करू नका. किमान ३० मिनिटे तरी शांतपणे, आनंदाने जेवण करण्यासाठी देण्याचा सल्ला त्यांनी दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मधुकर आपटे यांनी हृदयात बिघाड होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असल्याचे सांगूून दुुधी भोपळ््याचा वापर करून हृदयरोगापासून दूर राहण्याचे आवाहन केले. लवकीवर संशोधन करणारे मंगेश वांढरे यांनी लवकीचा हृदयरुग्णांना होणारा लाभ सांगितला. लवकीवर संशोधन केलेले डॉ. रवि कळसाईत यांनी लवकीविषयी माहिती देताना लवकी तीन महिने सतत घेण्याचा सल्ला देऊन त्यापेक्षा अधिक काळ लवकी घेतल्यास पित्त वाढून अ‍ॅसिडीटी होण्याचा धोका असल्याचे मत व्यक्त केले. लवकीवर केलेल्या संशोधनाबद्दल हृदय मित्र मंडळातर्फे त्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आभार डॉ. के. जी. मिसर यांनी मानले. (प्रतिनिधी)