शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

जयस्वाल निकोच्या २०६ कोटींच्या पोलाद प्रकल्पावर ‘ईडी’ची टाच

By admin | Updated: June 10, 2017 02:27 IST

जयस्वाल निको कंपनीच्या छत्तीसगडच्या बिलासपूर जिल्ह्यातील डागोरी गावातील पोलाद प्रकल्पावर

काळा पैसा प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलआय) कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जयस्वाल निको कंपनीच्या छत्तीसगडच्या बिलासपूर जिल्ह्यातील डागोरी गावातील पोलाद प्रकल्पावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) टाच आणली आहे. प्रकल्प आणि मशिनरीची किंमत २०६ कोटी रुपये असून ईडीने काळा पैसा प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलआय) कारवाई केली आहे. प्राप्त माहितीनुसार, जयस्वाल निकोला त्यांच्या कॅप्टिव्ह पॉवर प्रकल्पासाठी छत्तीसगडमध्ये गरे पाल्मा-४ कोल ब्लॉक दिला होता. कंपनीने कोळशाची धुलाई करून त्यातील राखेचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा कमी करून तयार झालेला कोळसा प्रकल्पात वापरावा, असे कोल मंत्रालयाने कंपनीला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. कोळशाच्या धुलाईदरम्यान झालेल्या अस्वीकृत वस्तूंचा उपयोग कंपनीने डागोरी येथील स्पन्ज आयरन प्रकल्पात केला. २०१२ मध्ये कोळसा खाण वाटपात गैरव्यवहार झाल्यानंतर सीबीआयने गरे पाल्मा-४ च्या वाटपाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. जयस्वाल निकोने चुकीची माहिती सादर करून तो फसवणूक करून मिळविल्याचे आढळून आले होते. त्या वेळी सीबीआयने कंपनीविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. सीबीआयच्या विशेष न्यायालयात अजूनही हे प्रकरण सुरू आहे. ईडीने कोल ब्लॉक वाटपात अनियमिततेच्या आरोपावरून सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारावर कंपनीविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. कंपनीने गरे पल्मा ब्लॉकमधून २००५ ते २००६ दरम्यान ३.८ दशलक्ष टन कोळशाचे उत्खनन केले. कंपनीने वॉशरी न उभारता कोळसा थेट कॅप्टिव्ह पॉवर प्रकल्प आणि स्पन्ज आयरन प्रकल्पात वापरला, असा आरोप ईडीने केला आहे. संपूर्ण कोळसा त्यांच्या प्रकल्पामध्ये स्टील आणि वीज उत्पादनासाठी ब्लॉकमधून काढला होता. पोलाद आणि वीज विक्रीतून मिळणारा नफा कंपनीच्या आरक्षित आणि अधिशेषमध्ये जमा करण्यात आला आहे. कंपनीने विचाराधीन कालावधीत आपली उत्पादन क्षमता आणि स्थिर मालमत्तेचा विस्तार केल्याचा आरोप ईडीने केला आहे. कंपनीने भरलेली रॉयल्टी आणि अतिरिक्त सेस कपात केल्यानंतर असे दिसून येते की, कंपनीला ब्लॉकमधून कोळसा काढल्यानंतर २०६ कोटी रुपयांचा फायदा झाला होता. हा नफा गुन्हेगारीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा भाग आहे. (कोळसा खाण वाटपात भ्रष्टाचाराचा सीबीआयचा पुरावा), असे म्हटले आहे.