शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

विवेकानंद स्मारकामुळे नागपूरच्या वैभवात भर

By admin | Updated: April 4, 2016 05:57 IST

गेल्या तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर रविवारी अंबाझरी फ्लो पॉर्इंटवर स्वामी विवेकानंद यांची २१ फूट उंचीची मूर्ती

नागपूर : गेल्या तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर रविवारी अंबाझरी फ्लो पॉर्इंटवर स्वामी विवेकानंद यांची २१ फूट उंचीची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. मध्य भारतातील ही सर्वात उंच मूर्ती असून देशातील प्रसिद्ध मूर्तिकार पद्मभूषण राम सुतार यांनी ती बनविली आहे. या भव्य मूर्तीमुळे नागपूरच्या वैभवात भर पडणार आहे. या मूर्तीवर तीन कोटींचा खर्च करण्यात आला आहे. २१ फूट उंच मूर्ती व ३० फूट उंचीचा पॅडेस्टल यासह ५१ फूट उंची होणार आहे. स्मारक परिसराला सनसेट पॉर्इंट म्हणून ओळखले जाणार आहे. येथे म्युझिकल व लेझर फाऊं टेन उभारत तीन महिन्यात या परिसराचे सौंदर्यीकरण केले जाणार आहे. आॅगस्टपर्यत हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. परंतु ११ सप्टेंबर १८९३ मध्ये स्वामी विवेकानंद यांनी शिक ागो येथे भाषण केले होते. त्यामुळे ११ सप्टेंबरला या प्रकल्पाचे लोकार्पण केले जाणार आहे. मार्च २०१३ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु प्रस्ताव प्रलंबित होता. सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी यांच्या प्रयत्नामुळे प्रकल्प मार्गी लागला. हे स्थळ पर्यटन केंद्र म्हणून विकसित केले जाणार आहे. (प्रतिनिधी)चंद्रपुरातून आणली क्रेन४राम सुतार यांचा मुलगा अनिल सुतार हे स्वत: मूर्तीसह नागपुरात पोहचले. ट्रेलरच्या साहाय्याने दोन दिवसापूर्वी ही मूर्ती कळमेश्वर येथे आणण्यात आली. परंतु भव्य मूर्ती उचलण्यासाठी लागणारी मोठी क्रेन मिळत नव्हती. त्यामुळे चंद्र्रपूर येथून १५० फु टाची क्रेन मागविण्यात आली. रविवारी सकाळी दयाशंकर तिवारी व विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांच्या उपस्थितीत मूर्ती उतरवण्यात आली. प्रकल्पाचे वैशिष्ट्ये४मूर्तीसाठी ४ टन कांस्य (ब्र्रांझ)वापरण्यात आले.४मूर्ती २१ फ्ूट उंच असून पॅडेस्टल ३० फूट उंचीचे आहे.४गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांची मूर्ती निर्माण करणारे राम सुतार यांनी ही मूर्ती बनविली आहे४स्वामी विवेकानंद यांची देशात सर्वात उंच मूर्ती आहे. ४अंबाझरी ओव्हर फ्लो येथे मूर्ती स्थापित केली जाणार आहे.तातडीने काम पूर्ण करणारतीन महिन्यात स्मारकाचे उर्वरित काम तातडीने पूर्ण केले जाईल. मूर्तीची स्थापना झाल्यानंतर कामाला गती येईल. आॅगस्टपर्यत काम पूर्ण करून लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल.दयाशंकर तिवारी, सत्ता पक्षनेता