शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

करवाढीवरून तापला पारा !

By admin | Updated: April 21, 2015 01:55 IST

ऊन तापू लागल्यामुळे शहरात पारा चढू लागला असताना सोमवारी महापालिका सभागृहातही करवाढीच्या मुद्यावरून

काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध : महापौरांच्या राजीनाम्याची मागणी नागपूर : ऊन तापू लागल्यामुळे शहरात पारा चढू लागला असताना सोमवारी महापालिका सभागृहातही करवाढीच्या मुद्यावरून वातावरण तापले. भाजपप्रणीत सत्ताधाऱ्यांनी मालमत्ता करात केलेल्या वाढीविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली. गेल्या सभेत करवाढीला विरोध केला असतानाही इतिवृत्तात ‘एकमताने’ करवाढ मंजूर करीत असल्याचे कसे नमूद करण्यात आले, यावर काँग्रेस-राष्ट्रवादीने तीव्र आक्षेप घेतला. महापौर इतिवृत्तात वारंवार ‘चिटिंग’ करीत आहेत, सदस्यांची फसवणूक करीत आहेत, असा आरोप करीत विरोधकांनी महापौरांच्या आसनासमोर येत नारेबाजी केली. विरोधक चर्चेला तयार नव्हते मागील सभेत करवाढीचा विषय आला तेव्हा त्यावर चर्चा न करता विरोधक सभागृहाबाहेर निघून गेले. त्यानंतर सभागृहात उपस्थित सदस्यांनी एकमताने विषय मंजूर केला व तेच इतिवृत्तात नमूद करण्यात आले. आता पुन्हा त्याच विषयाचा बाऊ करण्याची विरोधकांना काहीच गरज नाही. आजही विषयपत्रिकेवरील विषय पुकारले असता विरोधकांनी नामंजूर म्हटले नाही- प्रवीण दटके, महापौरमहापौर चुका करीत आहेत महापौरांना सभेच्या कामकाजाच्या पद्धतीची माहिती नाही. यापूर्वीही तीन अभियंत्यांची नियुक्ती करण्याच्या विषयात महापौरांनी घोळ घातला होता. शेवटी त्यांना सभागृहाची माफी मागावी लागली होती. आता करवाढीच्या विषयावरही विरोधकांनी विरोध केला असतानाही एकमताने मंजूर केला असल्याचे इतिवृत्तात नमूद केले. महापौर चुकांवर चुका करीत असून सदस्यांची फसवणूक करीत आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा.- विकास ठाकरे, विरोधी पक्षनेते ...तर राष्ट्रवादी रस्त्यावर उतरेलसत्ताधाऱ्यांनी भरमसाट करवाढ केली आहे. नागरिक नगरसेवकांच्या घरी जाऊन जाब विचारत आहेत. लोक त्रस्त आहेत. असे सुरू राहिले तर कराच्या ओझ्याने नागरिकांवर घरे विकण्याची वेळ येईल. सत्ताधाऱ्यांनी ही करवाढ लागू करण्यापूर्वी सामाजिक संघटना व नागरिकांची मते जाणून घ्यावी. करवाढ रद्द केली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. - प्रकाश गजभिये, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस