शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

औषध तुटवड्यावर ‘जेनेरिक’चा डोज!

By admin | Updated: May 22, 2015 02:56 IST

आजघडीला प्रत्यक्ष आजारापेक्षा त्यावरचा उपचारच जास्त मोठे संकट असल्यासारखे प्रत्येकाला वाटते.

नागपूर : आजघडीला प्रत्यक्ष आजारापेक्षा त्यावरचा उपचारच जास्त मोठे संकट असल्यासारखे प्रत्येकाला वाटते. या वाढत्या महागाईच्या काळात अनेक नागरिक परवडत नाहीत म्हणून औषधे न घेताच रोग आणि आजार सहन करतात. यातच शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांच्या तुटवड्यामुळे सामान्य रुग्णांना औषध मिळेनासे झाल्याचे चित्र आहे. यावर उपाय म्हणून मेडिकलने जेनेरिक औषधांचा वापर करण्याचा विचार सुरू केला आहे. औषधांचे थकीत बिल आणि अधिष्ठात्यांचे साहित्य खरेदीचे अधिकार वाढविल्यास हे शक्य होणार आहे. अन्न-वस्त्र-निवाऱ्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आरोग्याचा. वाढत्या महागाईच्या काळात अनेकांना खासगी डॉक्टरांचे शुल्कासह औषधांच्या किमती परडवत नाही, परिणामी शासकीय रुग्णालयाची वाट धरतात. परंतु येथेही अनेक औषधी बाहेरून घ्यावी लागत असल्याने रुग्ण अडचणीत येतो. यातच औषध पुरवठादारांची बिले थकल्यास औषधांचा तुटवडा आणखी बिकट होतो. यावर उपाय म्हणून बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या सर्वच रुग्णांना औषध उपलब्ध करून देण्यासाठी मेडिकल प्रशासन जेनेरिक औषधांची मदत घेण्याच्या विचारात आहे. सध्या मेडिकलचे औषध पुरवठाधारकांचे १६ कोटींचे बिल थकीत आहे. ते मिळाल्यास आणि अधिष्ठात्यांना ५० लाखांपर्यंत साहित्य खरेदी करण्याचे अधिकार वाढविल्यास ही योजना सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, या योजनेमुळे रोजची दोन हजार रुग्णांची ओपीडी (बाह्य रुग्ण विभाग) वाढून चार हजार होण्याची शक्यता आहे. जेनेरिक औषध गरिबांसाठी जणू प्राण वाचविणारी ‘संजीवनी’ ठरली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मदत व्हावी म्हणून जनमंचने नागपुरात पहिले जेनेरिक्स औषध उपलब्ध करून महत्त्वाची सेवा सुरू केली आहे. विशेष म्हणजे, नागपूर मेडिकल कॉलेजचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी ‘प्रिस्क्रिप्शन’ लिहून देताना जेनेरिक औषधे लिहनू द्यावी, असे फर्मान काढले होते, परंतु या योजनेचे पालनच झाले नाही. अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी आता ही योजना आणली आहे. ती किती यशस्वी होते, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)